टीम मंगळवेढा टाईम्स ।
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत आवास प्लस २०२४-२५ सर्वेक्षणात नाव असूनही तांत्रिक कारण अथवा प्रणालीद्वारे (System Reject) अर्ज बाद झालेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे.

अशा लाभार्थ्यांनी कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीत (PWL) नाव कायम ठेवण्यासाठी तातडीने विहित नमुन्यातील हमीपत्र व कागदपत्रे ग्रामपंचायतीत सादर करावीत, असे आवाहन मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती दीपालीताई आनंद ताड यांनी केले आहे.

हमीपत्रासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड झेरॉक्स प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स व जॉब कार्ड, रेशन कार्ड झेरॉक्स प्रत, तहसीलदार कार्यालयाकडील उत्पन्नाचा दाखला,सध्या राहत असलेल्या कच्च्या घराचा जीपीएस टॅग (GPS Tag) असलेला फोटो

महत्त्वाच्या अटी व पात्रता निकष:
कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर देशात पक्के घर नसावे., तीन अथवा चारचाकी वाहन (कार, ट्रॅक्टर, हार्वेस्टर इ.) नसावे., ५०,००० रुपयांपेक्षा अधिक मर्यादेचे क्रेडिट कार्ड नसावे.

कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय/निमशासकीय सेवेत किंवा करदाता (Income Tax/Professional Tax) नसावा.

२.५ एकरांपेक्षा जास्त बागायती अथवा ५ एकरांपेक्षा जास्त जिरायती जमीन नसावी.
कुटुंबाचे मासिक उत्पन्न १५,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे तसेच यापूर्वी शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

अंतिम मुदत: ३१ ऑगस्ट २०२६
”आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना घरकुल देण्याचा प्रयत्न आहे. तालुक्यातील एकाही पात्र बेघर अथवा गरजू कुटुंबावर अन्याय होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रणालीने अर्ज बाद झालेल्या सर्व पात्र नागरिकांनी मुदतीपूर्वी ग्रामपंचायतीत हमीपत्र दाखल करून योजनेचा लाभ घ्यावा.”— दीपालीताई आनंद ताड (सभापती, मंगळवेढा पंचायत समिती)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














