mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 5, 2026
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

टीम ​मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):

मंगळवेढा तालुक्यात पर्जन्यमानाचे अत्यंत कमी प्रमाण आणि पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून, बाधित शेतकऱ्यांना सरसकट व क्षेत्रनिहाय आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी, अशी जोरदार मागणी घरनिकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बालाजी गरड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मंगळवेढा तहसीलदारांना अधिकृत निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

​सर्व पीक पिके, ऊस व फळ बागायतदारांवर मोठे संकट

​तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर फळबागा आहेत. पावसाअभावी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने अनेक वर्षांच्या कष्टाने उभारलेल्या या फळबागा वाळून जाण्याचा थेट धोका निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून, मोठा खर्च करून या बागा जगवल्या आहेत. जर वेळेत मदत मिळाली नाही, तर शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बागायतदारांसाठी तातडीने विशेष उपाययोजना राबवून सरसकट नुकसान भरपाई मंजूर करावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

​थेट खात्यात मदत जमा करा!

​दुष्काळामुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न बिकट झाला असून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. शासकीय मदतीपासून केवळ कागदोपत्री प्रक्रिया किंवा विलंबाने कोणताही शेतकरी वंचित राहता कामा नये. महसूल प्रशासनाने तातडीने सर्व भागाचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव सादर करावा आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट भरपाईची रक्कम वर्ग करावी, असा इशारा उपसरपंच बालाजी गरड यांनी दिला आहे.

शासनाने तात्काळ निधी मंजूर करावा

​”दुष्काळ जाहीर झाला असला तरी जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. ही केवळ मागणी नसून शेतकऱ्यांच्या जगण्याचा हक्क आहे. प्रशासनाने तात्काळ निधी मंजूर करावा.”— बालाजी गरड (उपसरपंच, ग्रा. पं. घरनिकी)

​या निवेदनावर सरपंच सौ. सुनिता प्रकाश रणदिवे आणि उपसरपंच बालाजी गरड यांच्या स्वाक्षऱ्या असून, संपूर्ण तालुक्यातून सरसकट मदतीसाठी शेतकरी वर्ग एकवटत आहे.

यावेळी बापू भुसे, दादासो मोरे, शुभम चव्हाण, वैभव मोरे, सागर मोरे, लखन मोरे, सत्यवान मोरे, यांच्यासह  अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बालाजी गरड

संबंधित बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 5, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026
Next Post
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 5, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 5, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..