टीम मंगळवेढा टाईम्स।
वाऱ्याचा वेग वाढला आहे, आज अकवन चक्रीवादळ रात्री लॅण्डफॉल होण्याची शक्यता आहे.ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावर हे चक्रीवादळ लॅण्डफॉल करणार आहे. त्यामुळे त्याचा थेट धोका महाराष्ट्राला बसणार नाही.
मात्र महाराष्ट्रातील हवामानावर थोडा परिणाम होणार आहे. काकीनाडाजवळ याचा लॅण्डफॉल पॉईंट असणार आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरातून हे तिसरं वादळ आलं आहे.

स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादळामुळे विदर्भात वादळी वारे सुटतील आणि हलक्या सरुपाचा पाऊस पडणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या हवेमुळे वातावरण कोरडं आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात काही ठिकाणी अचानक थंडी गायब झाली आहे.

घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा रात्री आणि पहाटे कमी झाला आहे. गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान वाढ पाहायला मिळत आहे.

कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अलर्ट
महाराष्ट्रात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये २२ नोव्हेंबर रोजी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बाकी महाराष्ट्रात वातावरण कोरडं राहणार आहे. काही भागांमध्ये वातावरण दुपारी ११ ते ४ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एल निनोमुळे यावेळी थंडी जास्त राहणार नाही.

कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कोणताही हवामान इशारा नाही. मुंबईत सकाळी धुके किंवा धुसर वातावरण राहील आणि त्यानंतर आकाश बहुतांश निरभ्र राहील. मुंबईत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.

एल निनोचा इम्पॅक्ट हा मार्च ते एप्रिल २०२७ पर्यंत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यावेळी भीषण उष्णता राहणार आहे. यंदा मान्सून लवकर आला नाही तर दुष्काळाचं संकट अधिक भीषण होत जाईल याची भीती आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स किंवा चक्रीवादळ पुन्हा येतं का याकडे हवामान विभागाचं लक्ष लागलं आहे मात्र सध्या तरी तसे कोणतेही नवीन संकेत मिळत नाही. वातावरण उष्ण आणि कोरडं राहण्याचे संकेत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












