टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी) :
मद्यप्राशन करून बेदरकारपणे ट्रॅक्टर चालवणाऱ्या दोन चालकांना मंगळवेढा पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर लावण्यात आलेल्या नाकाबंदी आणि वाहन तपासणीदरम्यान हे दोन्ही चालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आले.।
संभाव्य अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी तातडीने दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेत संबंधित चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

मंगळवेढा शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नाकाबंदीदरम्यान संशयास्पदरीत्या येणाऱ्या दोन ट्रॅक्टरची पोलिसांनी तपासणी केली असता, दोन्ही चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.

अवजड वाहन मद्यप्राशन करून चालवणे नागरिकांच्या जीवावर बेतू शकते, हे लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही ट्रॅक्टर जप्त केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या सूचनेनुसार ही धडक कारवाई करण्यात आली.

या पथकात सहायक पोलीस निरीक्षक ढेरे, हवालदार संभाजी यादव, पोलीस कॉन्स्टेबल सूरज साळुंखे आणि प्रवीण जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार संभाजी यादव करत आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
“मद्यप्राशन करून वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा तर आहेच, शिवाय त्यामुळे स्वतःसह निष्पाप नागरिकांचाही जीव धोक्यात येतो. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे,” असे आवाहन मंगळवेढा पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













