टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):
ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे आणि सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सलगर बुद्रुक (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथे ‘सुवर्णश्री अर्बन महिला को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.’ या नवीन पतसंस्थेचा भव्य उद्घाटन समारंभ गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

उद्घाटन सोहळ्यानिमित्त संस्थेतर्फे सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्याला धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

मान्यवरांच्या हस्ते होणार उद्घाटन:
या संस्थेचे उद्घाटन परमपूज्य श्री. योगी कल्लीनाथ देवरु (जगद्गुरु श्री दिगंबरेश्वर संस्थान मठ, कोल्हार, विजयपूर) आणि ह.भ.प. संदेश भोसले महाराज (श्री संत सद्गुरु बागडे महाराज भक्त आश्रम, मारोळी) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैरवनाथ उद्योग समूहाचे चेअरमन श्री. अनिल (दादा) सावंत हे असतील. तसेच दामाजी शुगरचे चेअरमन श्री. शिवानंद पाटील, संचालक श्री. बसवराज पाटील आणि जंगलगीचे माजी सरपंच श्री. राजकुमार ह. पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

संस्थेच्या आकर्षक ठेव व कर्ज योजना:
“आजची बचत… उद्याचे उज्वल भविष्य…!” हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू होणाऱ्या या संस्थेने ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक योजना आणल्या आहेत:

आकर्षक व्याजदर:
मुदत ठेवींवर सर्वसाधारण नागरिकांना ६% ते १२%, तर महिला व ज्येष्ठ नागरिकांना ६.५% ते १२.५% पर्यंत व्याजदर दिला जाणार आहे.

विशेष बचत योजना:
‘मासिक प्राप्ती ठेव योजना’ (प्रत्येक १ लाखास दरमहा रु. १०००/- व्याज), ‘लखपती ठेव योजना’, मुली व महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘कन्यारत्न ठेव योजना’ तसेच दाम दुप्पट (५ वर्षे ११ महिने), दाम तिप्पट (८ वर्षे) आणि दाम चौपट (१० वर्षे) अशा विविध योजना उपलब्ध आहेत.
सोने तारण व इतर कर्ज सुविधा:
अवघ्या १० मिनिटांत आणि कमीत कमी कागदपत्रांमध्ये प्रति तोळा रु. १,३०,०००/- पर्यंत सोने तारण कर्ज (कोणतेही छुपे चार्जेस न घेता) उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासोबतच शेती कर्ज, पिग्मी कर्ज, व्यवसाय कर्ज, वाहन तारण कर्ज, गृह कर्ज, पर्सनल लोन आणि महिला बचत गट कर्ज योजनाही कार्यान्वित असतील.
डिजिटल बँकिंग: ग्राहकांना घरबसल्या व्यवहार करता यावेत यासाठी NEFT, RTGS, IMPS, QR Code आणि मोबाईल बँकिंग यांसारख्या अत्याधुनिक सुविधाही संस्थेने उपलब्ध केल्या आहेत.
संस्थेच्या संस्थापक सौ. वैशाली बसगोंडा पाटील, चेअरमन सौ.सुजाता विठ्ठल तेली, व्हा.चेअरमन सौ. वंदना राजु कांबळे, सचिव सौ. रेणुका सुरेश तेली, आधारस्तंभ श्री. चंद्रशा भिमण्णा तेली,
मार्गदर्शक चंद्रशेखर सिद्धाना तेली, श्री. प्रकाश हणमंत तेली व श्री. रायगोंडा तमण्णा तेली, मॅनेजर अशोक गोपीचंद जाधव यांच्यासह सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद आणि सभासदांनी या उद्घाटन सोहळ्यास व तीर्थप्रसादास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: ९०११३०४१०० / ९५४५१४७७७२ / ९१६८८८८२९१ / ७४९८९५६९९९.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












