टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):
नंदूर रोडवर ट्रॅक्टरने मोटर सायकलस्वारास जोराची धडक दिल्याने मोटर सायकलस्वार समाधान राजाराम मोरे (वय ३२, रा. डोणज) हा गंभीर जखमी होवून मयत झाल्याची घटना घडली असून ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर जागेवर सोडून फरार झाला असून ट्रॅक्टर चालकाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वा. यातील फिर्याद देणारे लक्ष्मण शिंदे रा. डिकसळ यांचे मावसभाऊ तथा मयत मोटर सायकलस्वार समाधान मोरे हे त्यांच्या

युनिकॉर्न मोटर सायकल एम.एच.१२, आर.झेड ११९७ वरून ते डोणज येथून बालाजीनगरकडे जात असताना आप्पासाो गोडसे यांच्या नेटींग मशिनसमोरील रोडवर

ट्रॅक्टर चालकाने आपल्या ताब्यातील एम एच ४०, सी.ए.३४३१ हा ट्रॅक्टर निष्काळजीपणे बेशिस्तपणे वेगाने चालवून मोटर सायकलस्वारास जोराची धडक देवून गंभीर जखमी करून

त्याला उपचारासाठी हॉस्पीटलला घेवून न जाता व अपघाताची खबर पोलिसांना न देता वाहन सोडून निघून गेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या अपघातातील मोटर सायकलस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













