मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यात सध्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र आल्यास ते नेमक्या कोणत्या आघाडीत जाणार, इंडिया आघाडीत की महायुतीत असाही सवाल उपस्थित होत आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोठा दावा केला आहे. ‘अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते,’ असं अतुल लोंढे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. या चर्चा सुरू असतानाच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्तावच शरद पवारांकडे आलेला नाही, अशी माहितीही समोर येतेय. राष्ट्रवादीतल्या विश्वसनीय सूत्रांनीच ही माहिती दिली.

अजित पवार हयात असताना ज्या गोष्टी ठरल्या होत्या, त्या पुढे कशा न्यायच्या यावर चर्चेचं गाडं अडल्याची सूत्रांची माहिती आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते विलीनीकरणाबाबत आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी पाडव्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर तटकरेंनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

यामुळं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना वेग आला आहे. वर्षा निवासस्थानी तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीपूर्वी मंगळवारी सुनेत्रा पवारांसोबत तटकरे यांची दीड तास चर्चा झाली होती.

त्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर बोलताना सुनेत्रा पवार यांनी जशी वेळ येईल, तशा गोष्टी आपल्याला कळतील” असं म्हणत विलिनीकरण चर्चा नाकारली नसल्याने सर्व शक्यतांना वाव असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर सुनील तटकरे यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, संजय राऊतांचा स्फोटक दावा
महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. सध्याची दोन्ही राष्ट्रवादीमधील नेत्यांची वक्तव्य संभ्रामात टाकणारी आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. ‘जशी वेळ येईल तशा गोष्टी तुम्हाला कळतीलच’, असे सुनेत्रा पवारांनी म्हटल्याने विलीनीकरणा संदर्भात आता वेगवेगळ्या चर्चा रंगताना दिसत आहेत.
तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 20 ते 22 आमदार बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय… संजय राऊतांच्या या विधानानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पलटवार केलाय. स्वतःचे 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले, तेव्हा राऊत यांना भविष्यवाणी करता आली नाही, असा सवाल नवनाथ बन यांनी विचारला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












