मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
चांगला पाऊस पडला की शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या खताची टंचाई ठरलेली असते. शेतकऱ्यांनी तास न् तास ताटकळत बसूनही खत मिळण्याचा भरवसा नसायचा. मात्र आता ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणालीमुळे घरबसल्या खताची आगाऊ बुकिंग सुविधा उपलब्ध झाली आहे.

खरीप हंगाम सुरू झाला अन् पाऊस पडू लागला की खरीप पेरणीची गडबड सुरू होते. याशिवाय ऊस व इतर पिकांना मेहनत करून खतांची मात्रा दिला जातो. जसजशी खरीप पेरणी क्षेत्रात वाढ होईल तसतसे खतांच्या मागणीत वाढ होते.

युरिया, डिएपी अशा ठराविक खतांची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. एकतर शेतकऱ्यांकडून ठराविक खतांची मागणी असते व असे खत पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसते किंवा खते उपलब्ध असली तरी कृत्रिम टंचाई केली जाते.

खत देणे बंधनकारक
अॅपवरून खत बुक केल्यावर, संबंधित दुकानदाराला तुम्हाला ते खत देणे कायदेशीररीत्या बंधनकारक राहील; तो कोणत्याही प्रकारची टाळाटाळ करू शकणार नाही.

लिंकिंगपासून मुक्ती..
अनुदानित खतांसोबत इतर कोणत्याही अन्य कृषी निविष्ठा घेण्याची सक्ती दुकानदार करू शकणार नाही. सक्ती केल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेलद्वारेच खताची विक्री
२२ ऑक्टोबरपासून जिल्ह्यामध्ये फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेलद्वारेच खताची विक्री होणार आहे. आता खतांसाठी दुकानाबाहेर रांगा लावण्याची अजिबात गरज नाही. खत खरेदी झाली आता पूर्णपणे डिजिटल आणि सोपी झाली आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी आणले आहे “फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल” कोणत्या खत दुकानात कोणते खत उपलब्ध आहे आणि किती साठा आहे, हे आता तुम्हाला मोबाइलवरच दिसणार आहे.(स्रोत:लोकमत)
अधिक दर नाही.
दोन दिवसांची मुभाः खत बुक केल्यापासून पुढील २ दिवसांच्या आत स्वतः शेतकरी किंवा कुटुंबातील कोणताही प्रतिनिधी दुकानात जाऊन खत ताब्यात घेऊ शकतो. कोणत्याही खताची छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होणार नाही.
अधिक माहितीसाठी गावातील कृषी सखी, कृषी मित्र, पोक्रा समूह सहाय्यक, सहाय्यक कृषी अधिकारी, पंचायत समिती व तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. शेतकरी बांधवांनी या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा व पैसा वाचवावा.-शुक्राचार्य भोसले,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












