मंगळवेढा टाईम्स न्युज ।
सोलापूर जिल्ह्यातील बालके व किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य सुदृढ राहावे, रक्तक्षयाचे प्रमाण कमी व्हावे आणि शारीरिक व बौद्धिक विकास चांगला व्हावा, या उद्देशाने

येत्या २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार असून जवळपास दहा लाख मुलांना या गोळ्यांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी दिली आहे.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी व सर्व शासकीय आरोग्य संस्थांच्या माध्यमातून एकाच दिवशी जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यात एकूण १ ते १९ वयोगटातील ९ लाख ८३ हजार ७०६ बालकांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत.

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या माध्यमातून, तर अंगणवाडीत नोंद असलेल्या बालकांना अंगणवाडी केंद्रात गोळ्या दिल्या जातील. शाळा किंवा अंगणवाडीत न जाणाऱ्या पात्र बालकांसाठी आरोग्य संस्थामार्फत व्यवस्था करण्यात आली आहे.

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व महिला व बालविकास विभाग यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे.
आजारी असल्यास गोळी घेऊ नका : कोपुरवाड
ज्या बालकांना २७ ऑक्टोबर रोजी आजारपण किंवा इतर कारणामुळे गोळी घेता आली नाही, त्यांच्यासाठी ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना २७ ऑक्टोबर रोजी जवळच्या शाळा, अंगणवाडी किंवा आरोग्य संस्थेत पाठवून मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. सतीश कोपुरवाड यांनी केले.

शारीरिक, बौद्धिक फायदा
लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये आतड्यातील जंतांचा प्रादुर्भाव झाल्यास शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटणे असे गंभीर परिणाम होतात. नियमित जंतनाशक औषधोपचारामुळे मुलांचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते अन् बौद्धिक फायदाही.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














