मंगळवेढा टाईम्स न्युज ।
सांगोला तालुक्यातून सुरुवात करून आज संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात यशस्वी वाटचाल करणाऱ्या ‘सूर्योदय उद्योग समूह’ आणि ‘सूर्योदय फाऊंडेशन’ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ची घोषणा करण्यात आली आहे.

मंगळवेढा येथील कै. सौ. लक्ष्मीबाई दत्तू प्रशालेचे कर्तव्यदक्ष व आदर्श शिक्षक श्री. सतीश पांडुरंग इंगळे यांच्या अखंड शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच केंद्रबिंदू मानून स्वतःला शैक्षणिक कार्यात झोकून देणाऱ्या सतीश इंगळे सरांचे कार्य सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या याच कार्याची कृतज्ञतापूर्वक दखल घेऊन सूर्योदय परिवाराकडून त्यांच्या सन्मानाचा निर्णय घेण्यात आला.

सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिलभाऊ इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली हा गौरव सोहळा संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा: वार व दिनांक: शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ वेळ: दुपारी ठिक २:०० वाजता
स्थळ: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह (कचेरी समोर), नगर परिषद, सांगोला

या पुरस्काराबद्दल मंगळवेढा व सांगोला तालुक्यातून सतीश इंगळे सरांवर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सोहळ्यास समस्त शिक्षक वृंद, पालक व मित्रपरिवाराने वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन सूर्योदय परिवारातर्फे करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













