mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! ‘जीबीएस’ आजारमुळे 11 वर्षीय शाळकरी मुलाच्या मृत्यू, घरोघरी सर्वेक्षण सुरू; नेमका काय आहे आजार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 28, 2026
in आरोग्य, राज्य
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) ने काल कळंबा येथील राजवर्धन नितीन बुचडे (वय ११, सध्या रा. महालक्ष्मी गल्ली, कळंबा, मूळ गाव कुडित्रे) याचा छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

दरम्यान, कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कळंबा गावात घरोघरी आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. महालक्ष्मी गल्ली, राम गल्ली, हनुमान गल्ली, टिपुगडे गल्ली आणि तिवले गल्ली येथे तपासणीवर भर आहे.

जिल्हा परिषद सदस्या विनीता भोगम आणि सरपंच सुमन गुरव यांनी आवाहन केले की, नागरिकांनी न घाबरता आरोग्य यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे.

आणखी दोघांची प्रकृती गंभीर

‘जीबीएस’ सिंड्रोम सदृश लक्षणे असलेल्या सात रुग्णांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. यातील दोघे गंभीर आहेत. उर्वरित पाचजणांची प्रकृती स्थिर आहेत.

याबाबतची तपशीलवार माहिती वैद्यकीय अधीक्षक वा अधिष्ठातांकडून मिळू शकली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत याबाबतची माहितीच पोहोचलेली नाही, याविषयी आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

प्राण्यांची विष्ठा पाण्यात मिसळल्याने हा संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे गावातील जलवाहिनीत सांडपाणी मिसळते का, याची तपासणी करत आहोत. आशा सेविकांची बैठक घेऊन तपासणीचा कालावधी वाढवला.-डॉ. भूषण मस्के, वैद्यकीय अधिकारी, कणेरी

‘अफवांवर विश्‍वास ठेवू नका’

जीबीएसबाबत आरोग्य विभागाने सांगितले की, जीबीएस संसर्गजन्य नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. मात्र, हात-पायांना मुंग्या येणे, पायांमध्ये अचानक अशक्तपणा जाणवणे किंवा चालताना तोल जाणे अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आरोग्‍य तपासणी मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डॉ. मस्के, आरोग्य साहाय्यक अनिल पोवार, डॉ. स्मिता पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी पद्मावती पाटील, आरोग्य सेविका प्रभादेवी कर्णिक, श्रेयश पुजारी, अभिजित काटकर आदी सहभागी आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

बाळंतपणात आई आणि बाळाची काळजी घेण्यासाठी पुरुषांनाही 15 दिवसांची पॅटरनिटी लीव्ह; मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा

November 27, 2026

धक्कादायक! तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

November 27, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! आता वर्षातून दोनदा सीईटी; गुण सुधारण्याची मिळाली संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक; परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर

November 27, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! तीन वर्ष जमीन कसली नाही तर सरकारकडे जाणार? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला मोठा खुलासा

November 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

दुष्काळामुळे वृक्षारोपण मोहिमेला कात्री; आता सरकारचा नवा ‘अॅक्शन प्लॅन’, थेट ‘शेतबांधावर झाडे’ लावणार

November 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

अलर्ट! चक्रीवादळामुळे महाराष्ट्राचं हवामान बदलणार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

November 22, 2026

महाराष्ट्रात नवे वेतन नियम लागू! आता ‘इतके’ तासांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाईम अन् सुट्टीच्या दिवशी काम केल्यास थेट दुप्पट पैसे मिळणार

November 19, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

आता हे काय नवीन! हॉलमार्क ही सोने शुद्धतेची गॅरंटी नाही, ग्राहकांच्या विश्वासाला तडा; कॅगच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

November 17, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ई-पीक पाहणीची डेडलाईन वाढली, नेटवर्क नसेल तरी होणार नोंदणी; फळबागा वाचविण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत बोअरवेलची मुभा

November 15, 2026

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! ‘जीबीएस’ आजारमुळे 11 वर्षीय शाळकरी मुलाच्या मृत्यू, घरोघरी सर्वेक्षण सुरू; नेमका काय आहे आजार?

November 28, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यातील केसरी रेशन कार्डधारकांना ‘इतके’ महिने मोफत अन्नधान्य मिळणार

November 28, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

बाळंतपणात आई आणि बाळाची काळजी घेण्यासाठी पुरुषांनाही 15 दिवसांची पॅटरनिटी लीव्ह; मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा

November 27, 2026

धक्कादायक! तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

November 27, 2026
चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

November 26, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदयद्रावक! शेतीतील नुकसान आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या मंगळवेढ्यातील तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

November 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा