मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सणासुदीला किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करताना ‘हॉलमार्क’ (Hallmark) पाहून तुम्ही निश्चिंत होत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हॉलमार्क असलेले सोने १०० टक्के शुद्धच असेल, याची कोणतीही शाश्वती देता येत नाही,

असा धक्कादायक खुलासा भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात ‘कॅग‘ (CAG) च्या अहवालातून समोर आला आहे. या अहवालामुळे सामान्य ग्राहकांच्या फसवणुकीचा धोका वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

ग्राहकांच्या विश्वासाला तडा
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सामान्य ग्राहक ‘९१६’ किंवा ‘२२ कॅरेट’ हॉलमार्क असलेल्या सोन्याला पसंती देतात आणि त्यासाठी जादा पैसेही मोजतात. मात्र, या हॉलमार्क दागिन्यांच्या शुद्धतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सोन्याची शुद्धता प्रमाणित करणाऱ्या सरकारी संस्थेच्या (BIS – भारतीय मानक ब्युरो) कार्यपद्धतीचे ‘कॅग’ने लेखापरीक्षण (Audit) केले असता, अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्या आहेत.

तपासणी यंत्रणेचा ढिसाळ कारभार उघड
नियमानुसार, ‘बीआयएस’च्या अधिकाऱ्यांनी वर्षातून किमान एकदा नोंदणीकृत ज्वेलर्सच्या दुकानांना भेट देऊन, ते प्रत्यक्षात शुद्ध सोने विकत आहेत की नाही याची प्रत्यक्ष तपासणी करणे अनिवार्य आहे.

परंतु, गेल्या पाच वर्षांत बीआयएसने ८० टक्क्यांहून अधिक नोंदणीकृत ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये तपासणीसाठी पाऊलही ठेवले नसल्याचे ‘कॅग’ने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
आकडेवारी काय सांगते?
देशातील ३९२ जिल्ह्यांमध्ये विना-हॉलमार्क सोने विकणे कायद्याने गुन्हा आहे.
यामुळे देशभरातील सुमारे २.३ लाख ज्वेलरी दुकानांनी बीआयएसकडे नोंदणी केली आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण २८,८६५ परवानाधारकांपैकी केवळ ५,४४४ दुकानांचीच तपासणी करण्यात आली.
याचाच अर्थ, तब्बल ८१ टक्के दुकानदारांची कोणतीही तपासणी झालेली नाही.
थोडक्यात, केवळ नोंदणी आणि हॉलमार्कचा शिक्का दिला जात असला, तरी प्रत्यक्ष दुकानांमध्ये जाऊन सोन्याच्या दर्जाची तपासणी होत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होण्याची भीती ‘कॅग’च्या या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
पक्के बील घ्या: सोने किंवा दागिन्यांची खरेदी केल्यानंतर त्याचे पक्के आणि करदात्याचे (GST Bill) बील आवर्जून घ्या।
HUID क्रमांक तपासा: दागिन्यांवर ६ अंकी अल्फा-न्यूमेरिक हॉलमार्क युनिक आयडी (HUID) आहे का, ते तपासून पहा।
तपासणीची सोय: सोन्याच्या शुद्धतेबद्दल शंका वाटल्यास, आपण BIS-अधिकृत टेस्टिंग सेंटरमध्ये जाऊन दागिन्यांची शुद्धता तपासू शकता।
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













