मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाल्यानंतर संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. विकसित भारत जी राम जी कायदा २०२५ अंतर्गत

मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी जलसंधारणासह विविध कामांचे नियोजन करून त्यांचा ‘शेल्फ’ तयार ठेवावा, असे आदेश गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख यांनी दिले आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण मजुरांना मागणीनुसार तातडीने रोजगार उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान पाच सिंचन विहिरी, २० शोषखड्डे, १० विहीर पुनर्भरणाची कामे, एक नाला सरळीकरण व खोलीकरण, एक रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि एक पानंद रस्ता अथवा मातोश्री पानंद रस्त्याचे काम शेल्फवर ठेवणे बंधनकारक केले आहे.

या कामांना १५ ऑगस्ट व २ ऑक्टोबरच्या ग्रामसभांमध्ये तसेच शिवारफेरीदरम्यान मंजुरी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंजूर कामांची युक्तधारा प्रणालीवर नोंद करणे आवश्यक आहे. ग्रामसभा ठराव ४ नोव्हेंबरपूर्वी, तर विहित नमुन्यातील प्रस्ताव व आवश्यक कागदपत्रे ६ नोव्हेंबरपर्यंत पंचायत समितीकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मजुरांकडून कामाची मागणी येताच ती तातडीने सुरू करता यावीत
दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातील मजुरांना रोजगारासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींनी जलसंधारणाची कामे मंजूर करून शेल्फवर ठेवावीत.
मजुरांकडून कामाची मागणी येताच ती तातडीने सुरू करता यावीत.-डॉ. जस्मिन शेख, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मंगळवेढा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











