टीम मंगळवेढा टाईम्स (विशेष प्रतिनिधी):
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार हर्षदा देशमुख यांना पदवीधरांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी प्रचंड बहुमताने विजयी करा, असे जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर रणे यांनी केले आहे.

सिद्धेश्वर रणे यांनी मतदारसंघातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, “ही निवडणूक केवळ एका उमेदवाराची किंवा राजकीय पक्षाची नाही; तर राज्यातील सुशिक्षित पदवीधरांचे भवितव्य, त्यांच्या हक्कांचा लढा आणि संधींची ही लढाई आहे.

आजचा पदवीधर सुशिक्षित बेरोजगारी, रोजगारनिर्मितीचा अभाव आणि उच्च शिक्षणातील वाढत्या समस्यांनी ग्रासला आहे. या सर्व प्रश्नांवर विधिमंडळात सक्षमपणे आणि आक्रमकपणे आवाज उठवू शकणारे, अनुभवसंपन्न व विश्वासार्ह नेतृत्व म्हणजे हर्षदा देशमुख होय.”

पदवीधरांच्या हितासाठी कटिबद्ध नेतृत्व
पुणे विभागातील पदवीधरांसाठी दर्जेदार रोजगाराच्या संधी निर्माण करणे, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ठोस धोरणे राबवणे, शिक्षण व्यवस्थेचा दर्जा सुधारणे आणि पदवीधरांच्या प्रलंबित मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करणे ही हर्षदा देशमुख यांची मुख्य ध्येये आहेत. त्यांच्या अभ्यासू आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे त्या पदवीधरांच्या प्रश्नांना योग्य न्याय देतील, असा ठाम विश्वास रणे यांनी व्यक्त केला.

मतदारांशी थेट संवाद साधा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मतभेद, हेवेदावे बाजूला ठेवून एकदिलाने मैदानात उतरण्याचे आवाहन सिद्धेश्वर रणे यांनी केले. प्रत्येक पदवीधर मतदाराच्या घरापर्यंत पोहोचून थेट संवाद साधावा, मतदारांची नोंदणी व प्रत्यक्ष मतदानावर भर द्यावा आणि हर्षदा देशमुख यांच्या विजयासाठी संपूर्ण ताकदीने सक्रिय राहावे, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










