मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत नागरिकांची अडचण जाणून आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा वॉर रूम सुरू करण्यात आली आहे.

या वॉर रूमच्या माध्यमातून पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याची समस्या, पीक नुकसान तसेच शेतकऱ्यांच्या विविध अडचणींबाबत तातडीने मदत मिळणार आहे.

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दहा दिवसांपूर्वी वॉर रूम सुरू करण्याची घोषणा केली होती. या रुममध्ये जमीन महसुलातील सूट, जलसंधारणाची कामे सुरू करणे, शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्य उपलब्ध करून देणे,

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आणि रोजगार हमी योजनेंतर्गत जास्तीत जास्त कामे सुरू करण्यासंदर्भातील तक्रारी ऐकून त्याचे निराकरण होणार आहे.

पीक नुकसानीचे पंचनामे, पीक विमा व नुकसानभरपाई, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती याबद्दल मार्गदर्शन होणार आहे.

टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीजजोडणी खंडित न करणे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आणि दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक मदत दिली जाणार आहे.

या क्रमांकांवर संपर्क साधा
८९९९२६५४७१ – विलास रणसुभे व सुहास म्हेत्रे, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय.
८९९९२५८६१० – एस. बी. देशमुख व सुदर्शन मामीडवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय.
८९९९२७६२९४ – एस. एन. अगरखेड आणि एम. आय. बागवान. याशिवाय, जिल्हा वॉर रूमच्या ०२१७-२७३१०१२ या हेल्पलाईन क्रमांकावरही संपर्क साधता येणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











