mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला! राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, भाजपची ताकद पणाला; दुष्काळाच्या सावटात मतदानाचा टक्का कोणाचा गेम करणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 23, 2026
in मंगळवेढा, राजकारण, राज्य, सोलापूर
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

टीम ​मंगळवेढा टाईम्स :

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवेढा तालुक्यात आज चुरशीने मतदानाला सुरुवात झाली आहे. तालुक्यात भाजपचे विद्यमान आमदार असल्याने स्थानिक पातळीवर भाजपचे पारडे जड मानले जात असले, तरी प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र दोन्ही आघाड्यांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

शेतकरी आणि तरुण वर्गातील नाराजीचा फटका भाजपला बसेल आणि याचा थेट फायदा महाविकास आघाडीला मिळेल, असा ठाम दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.

​तालुक्यातील राजकीय समीकरणे पाहता भाजपची संघटनात्मक ताकद विरुद्ध विरोधकांची रणनीती असा थेट सामना रंगला आहे.

विरोधकांच्या मते, तरुणांचे रोजगाराचे प्रश्न, प्रलंबित मागण्या आणि ग्रामीण भागातील असंतोष यामुळे सुशिक्षित मतदार यंदा महाविकास आघाडीच्या बाजूने झुकण्याची दाट शक्यता आहे.

तर दुसरीकडे, भाजप नेते आपल्या स्थानिक आमदारांच्या कार्यपद्धतीवर आणि संघटनात्मक बांधणीवर विजयाचा विश्वास व्यक्त करत आहेत.

​दुष्काळाचे सावट आणि मतदानाचा टक्का निर्णायक

सध्या मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे गंभीर सावट आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रत्यक्षात किती टक्के मतदान पार पडते, यावरच विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. दुष्काळी संकटात सापडलेला शेतकरी-पदवीधर वर्ग घरातून बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावणार का, आणि मतदानाचा टक्का वाढल्यास तो सत्तेच्या बाजूने झुकणार की परिवर्तनाच्या, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

​एकंदरीत, मंगळवेढ्यातील राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली असून शिक्षक आणि पदवीधरांचा गुप्त कौल कोणाच्या पारड्यात पडतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दोन्ही निवडणुकांसाठी एकूण ७ हजार ३३५ मतदार

शिक्षक व पदवीधर निवडणूक २०२६ साठी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मंगळवेढा तालुक्यात प्रशासकीय तयारी करण्यात आली आहे. शिक्षक मतदारसंघासाठी ९, तर पदवीधर मतदारसंघासाठी १५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

या दोन्ही निवडणुकांसाठी एकूण ७ हजार ३३५ मतदार असून, मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी २४ मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षक मतदारसंघासाठी ९ आणि पदवीधर मतदारसंघासाठी १५ अशी एकूण २४ मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक १, २ व ३, शिपाई, सूक्ष्म निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी प्रत्येकी १५, असे एकूण १०५ कर्मचारी नमूद करण्यात आले आहेत.

याशिवाय पाच झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी केंद्रनिहाय व्यवस्था आणि कर्मचारी नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

शिक्षक मतदारसंघासाठी २ हजार १४ मतदार

शिक्षक मतदारसंघासाठी आंधळगाव, भोसे, हुलजंती, मंगळवेढा, मरवडे, मारापूर, पंढरपूर येथील दोन केंद्रे आणि कासेगाव अशा ठिकाणी एकूण ९ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. या मतदारसंघात २ हजार १४ मतदार आहेत.

पदवीधर मतदारसंघात ५ हजार ३२१ मतदार

पदवीधर मतदारसंघासाठी एकूण १५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. आंधळगाव, भोसे, हुलजंती, मंगळवेढा येथील तीन केंद्रे, मरवडे, मारापूर, पंढरपूर येथील पाच केंद्रे आणि कासेगाव येथील दोन केंद्रांचा त्यामध्ये समावेश आहे. या मतदारसंघात ५ हजार ३२१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

मंगळवेढ्यात ‘शीतल कलेक्शन’च्या माहेश्वरी साडी महोत्सवाला उदंड प्रतिसाद; ग्राहकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा स्टॉक उपलब्ध, खास ऑफर्स सुरूच

November 7, 2026
या दिवाळीत करा स्वतःच्या हक्काच्या जागेचे स्वप्न पूर्ण! मंगळवेढ्यात ‘शिवशाही सिटी’ मध्ये बुकिंग सुरू; बुलेट, ई-स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9970766262 संपर्क साधा

या दिवाळीत करा स्वतःच्या हक्काच्या जागेचे स्वप्न पूर्ण! मंगळवेढ्यात ‘शिवशाही सिटी’ मध्ये बुकिंग सुरू; बुलेट, ई-स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9970766262 संपर्क साधा

November 7, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता आधुनिक शेती होणार अर्ध्या खर्चात, कृषी योजना सुरू; अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने अर्ज सादर करा; सभापती दिपाली ताड यांचे थेट आवाहन

November 7, 2026
दिवाळी धमाका! मंगळवेढ्यात ७/१२ डेव्हलपर्स निर्मित ‘शिवशाही सिटी (फेज २)’ मध्ये बुकिंग सुरू; प्रत्येक प्लॉटवर थेट बुलेट, ई-स्कूटरसह तब्बल ३३ प्लॉट ३३ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9890605962 संपर्क साधा

November 6, 2026

रतनचंद शहा बँकेची मोठी कारवाई! जप्त मालमत्तेत अनधिकृत प्रवेश भोवला; कर्जदार दाम्पत्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

November 6, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

ना कोर्ट, ना वकील! तहसीलदारांच्या मध्यस्थीने रस्त्यांचे वाद जागेवरच मिटले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

November 6, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा तालुक्यात खळबळ! ४० वर्षीय शेतकरी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय, पत्नीची पोलिसांत तक्रार

November 5, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘दोन अपत्यांची अट’ आता कालबाह्य: सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निरीक्षण; ​२००३ च्या निकालाचा फेरविचार होणार

November 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026
Next Post
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! २७ ऑक्टोबरला शाळा-अंगणवाड्यांत मिळणार मोफत 'या' गोळ्या; जाणून घ्या संपूर्ण नियोजन

ताज्या बातम्या

काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

मंगळवेढ्यात ‘शीतल कलेक्शन’च्या माहेश्वरी साडी महोत्सवाला उदंड प्रतिसाद; ग्राहकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा स्टॉक उपलब्ध, खास ऑफर्स सुरूच

November 7, 2026
या दिवाळीत करा स्वतःच्या हक्काच्या जागेचे स्वप्न पूर्ण! मंगळवेढ्यात ‘शिवशाही सिटी’ मध्ये बुकिंग सुरू; बुलेट, ई-स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9970766262 संपर्क साधा

या दिवाळीत करा स्वतःच्या हक्काच्या जागेचे स्वप्न पूर्ण! मंगळवेढ्यात ‘शिवशाही सिटी’ मध्ये बुकिंग सुरू; बुलेट, ई-स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9970766262 संपर्क साधा

November 7, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता आधुनिक शेती होणार अर्ध्या खर्चात, कृषी योजना सुरू; अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने अर्ज सादर करा; सभापती दिपाली ताड यांचे थेट आवाहन

November 7, 2026
दिवाळी धमाका! मंगळवेढ्यात ७/१२ डेव्हलपर्स निर्मित ‘शिवशाही सिटी (फेज २)’ मध्ये बुकिंग सुरू; प्रत्येक प्लॉटवर थेट बुलेट, ई-स्कूटरसह तब्बल ३३ प्लॉट ३३ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9890605962 संपर्क साधा

दिवाळी धमाका! मंगळवेढ्यात ७/१२ डेव्हलपर्स निर्मित ‘शिवशाही सिटी (फेज २)’ मध्ये बुकिंग सुरू; प्रत्येक प्लॉटवर थेट बुलेट, ई-स्कूटरसह तब्बल ३३ प्लॉट ३३ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9890605962 संपर्क साधा

November 6, 2026

रतनचंद शहा बँकेची मोठी कारवाई! जप्त मालमत्तेत अनधिकृत प्रवेश भोवला; कर्जदार दाम्पत्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

November 6, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

ना कोर्ट, ना वकील! तहसीलदारांच्या मध्यस्थीने रस्त्यांचे वाद जागेवरच मिटले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

November 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..