टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतजमिनीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेला लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना भालेवाडी (ता. मंगळवेढा) येथे घडली आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भालेवाडी येथील रहिवासी सौ. कलावती बाबुराव गवळी (वय ४१) यांच्या घरासमोर आरोपी राजकुमार ज्ञानोबा गवळी याने दारूच्या नशेत येऊन शेतजमिनीच्या वादावरून शिवीगाळ केली.
या प्रकाराबाबत विचारणा केली असता, आरोपी राजकुमार गवळी, सुरेखा राजकुमार गवळी, प्रकाश ज्ञानोबा गवळी व लक्ष्मी प्रकाश गवळी या चौघांनी मिळून फिर्यादी कलावती गवळी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.
दरम्यान, आरोपी राजकुमार गवळी याने तेथे पडलेला दगड हातात घेऊन फिर्यादीच्या उजव्या गुडघ्यावर मारून दुखापत केली. या झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील मणी-मंगळसूत्र तुटून गहाळ झाले आहे.
या प्रकरणी सौ. कलावती गवळी यांच्या तक्रारीवरून मंगळवेढा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार योगेश नवले करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










