सोलापूर : टीम मंगळवेढा टाईम्स ।
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय व बहुमोल कामगिरीची दखल घेऊन, श्रीमती सावित्रीबाई खडतरे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पाकणी ता. उत्तर सोलापूर जि.सोलापूर येथील जीवशास्त्र विषयाचे प्रा. डॉ.सागर महादेव पाटील यांना आनंदगंगा फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.कोल्हापूर येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटीच्या सेमिनार हॉल अतिग्रे ता. हातकणंगले जि. कोल्हापूर भव्य पुरस्कार सोहळा हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रम मध्ये आनंदगंगा फाउंडेशन तर्फे महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय योगदान देणाऱ्या शिक्षकांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार “आणि आदर्श भावी पिढी घडवणाऱ्या शाळांना “आदर्श शाळा पुरस्कार” प्रदान करण्यात आले.

यापूर्वी प्रा.डॉ. सागर पाटील यांना वेगवेगळ्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय, राज्यस्तरीय, महाराष्ट्र योद्धा,शिक्षण रत्न,जिल्हास्तरीय,राष्ट्रीय आदर्श सामाजिक समता, राष्ट्रीय शिक्षक रत्न,महाराष्ट्र भूषण,समाज रत्न,सामाजिक समता राष्ट्रीय पुरस्कार शिक्षक रत्न, नेशन बिल्डर अवार्ड , अश्या अनेक पुरस्कार प्राप्त असलेले शिक्षक प्रा.डॉ. सागर पाटील यांचा गौरव करण्यात आला.

या सोहळ्याचे अध्यक्ष स्थान महाराष्ट्र राज्य पूर्व शिक्षण संचालक महाराष्ट्र पुणे,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परीक्षेचे संचालक डॉ श्री गोविंद नांदेड यांनी भूषविले त्यांच्याच हस्ते प्रा. डॉ.सागर पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

तसेच या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद कोल्हापूर च्या अर्थ व शिक्षण समिती सभापती शितल यादव आणि सभापती प्रवीण यादव उपस्थित होते

तसेच याशिवाय संजय घोडावत युनिव्हर्सिटी चे डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर विराट गिरी, यशवंत व्यसनमुक्ती केंद्र, शिराळाच्या संचालक डॉक्टर सो साधना पाटील मॅडम आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदगंगा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. तानाजी पवार यांनी केले आणि आभार मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












