मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत पाणी व चारा टंचाई निर्माण झाली असून, चारा उपलब्ध नसलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चारा डेपो सुरू करण्यात येतील.

मागणी प्राप्त होताच प्रत्यक्ष पाहणी करून गरजेनुसार तातडीने चारा उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर दुष्काळासाठी स्थापन मंत्रिगटाच्या उपसमितीची बैठक झाली. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाणी, चारा व दुष्काळी परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बहुतांश भागांत अद्याप पुरेसा चारा असून काही ठिकाणी ३०,७० तर काही भागांत १०० दिवसांचा चारा शिल्लक असल्याचे गोरे यांनी सांगितले.

रब्बीची पेरणी करताना पाण्याचा अंदाज घ्या
उपलब्ध पाणीसाठ्यातून नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची वर्षभराची गरज भागेल, याची
प्रथम खात्री केली जाईल. त्यानंतर शिल्लक पाणी रब्बीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे पाण्याची उपलब्धता तपासूनच शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीतील संभाव्य बंडखोरीबाबत बोलताना, लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे; मात्र पक्षाकडून एका जागेसाठी एकाच उमेदवाराला अधिकृत उमेदवारी देता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















