टीम मंगळवेढा टाईम्स। आंधळगाव (प्रतिनिधी):
वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव आणि उत्सव नव्हे, तर समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची संधी असते, याचा प्रत्यय आंधळगाव येथे आला.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक साहित्य वाटप आणि स्वच्छता मोहीम असे स्तुत्य उपक्रम राबविले.

चिमुकल्यांच्या स्वप्नांना मिळाले बळ

आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंधळगाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नांना नवी दिशा मिळावी, या उदात्त हेतूने हा उपक्रम पार पडला. हातात नवीन शैक्षणिक साहित्य पडल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद कार्यकर्त्यांसाठी खऱ्या अर्थाने समाधान देणारा ठरला.

श्रमदानातून दिला स्वच्छतेचा संदेश
शैक्षणिक साहित्य वाटपानंतर कार्यकर्त्यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर चौक आणि गावातील स्मशानभूमी परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविली.

सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे,’ हा संदेश देत कार्यकर्त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन श्रमदान केले. गावाच्या स्वच्छतेसाठी एकत्र आलेले हात आणि कार्यकर्त्यांची एकजूट यामुळे या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत आहे.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती
या दोन्ही समाजोपयोगी उपक्रमांत दामाजी शुगरचे माजी संचालक सुरेश (अण्णा) भाकरे, माजी सरपंच महादेव माळी, अशोक (नाना) लेंडवे, राजमाता अर्बन बँकेचे संचालक पांडुरंग भाकरे, सरपंच लव्हाजी लेंडवे, अंकुशजी डांगे, आबासो माळी, माजी उपसरपंच जितेंद्र लेंडवे, अशोक भाकरे, राजू डांगे,

रामचंद्र आवताडे, सुरेश घोडके, ब्रह्मदेव माने, रामचंद्र बनसोडे, सुनील वेळापुरे, इस्माईल मुलाणी, माजी उपसरपंच सुयोग बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर माळी, शालेय समितीचे अध्यक्ष मनोज माळी, केशव जाधव, आप्पासो स्वामी, प्रशांत माळी, तनवीर मुलाणी, आदाम मुलाणी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नेत्याप्रती असलेले प्रेम आणि निष्ठा केवळ शुभेच्छांपुरती मर्यादित न ठेवता समाजहिताच्या कार्यातून व्यक्त केल्याने आंधळगावच्या कार्यकर्त्यांचा हा उपक्रम परिसरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










