टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी ब्रह्मपुरी येथील निष्ठावंत कार्यकर्ते श्री. सिद्धेश्वर पांडुरंग रणे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षासाठी त्यांनी दिलेले उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष वसंतराव दौलतराव देशमुख आणि कार्याध्यक्ष रवींद्रभाऊ पाटील यांनी या नियुक्तीचे अधिकृत पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

या नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की, आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सिद्धेश्वर रणे सक्रिय प्रयत्न करतील.

तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार साहेब यांचे पुरोगामी विचार सर्वदूर पोहोचवण्याचा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

सिद्धेश्वर रणे यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातून त्यांचे मोठ्या प्रमाणावर स्वागत व अभिनंदन होत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










