टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतातील नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू असून या प्रक्रियेत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. तालुक्यातील एकही पात्र शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, अशा सक्त सूचना प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केल्यास तत्काळ पाणी उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही आमदार समाधान आवताडे यांनी आली.

आज येड्राव, खवे, जित्ती व बावची या गावात आमदार समाधान आवताडे यांनी दुष्काळी पाहणी केली याप्रसंगी बोलत होते.

तालुक्यातील विविध भागांत निर्माण झालेल्या पाणी आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नागरिकांच्या समस्या जाणून घेत तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले गेले.

मागेल त्याला टँकर व टँकरद्वारे पाणीपुरवठा चाऱ्यासाठी पाठपुरावा
सध्या वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई भासू नये म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सर्व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू ठेवण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.

तसेच, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून तातडीने चारा उपलब्ध करून देण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्याकडे ठोस मागणी नोंदवण्यात आली आहे.
म्हैसाळचे २ टीएमसी पाणी दक्षिण भागाला मिळणार
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला असला, तरी भविष्यातील गरज लक्षात घेऊन सर्वांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

याशिवाय दक्षिण भागातील शेतीसाठी येत्या काही दिवसांत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून २ टीएमसी पाणी सोडण्यासाठी शासनाकडे युद्धपातळीवर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

या बैठकीस उपसभापती अर्जुन मल्लाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, हणमंत दुधाळ, सरपंच राजू गाडवे, उपसरपंच दत्तात्रय जाधव, प्रकाश गायकवाड, नंदकुमार जाधव, काशिनाथ पाटील, संतोष खांडेकर, लविंदर जगदाळे, अंकुश घाडगे सर, प्रकाश खंदारे, अण्णासाहेब पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










