मंगळवेढा टाईम्स न्युज ।
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि खरीप पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील बाधित १० लाख २४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ५ लाख ४६ हजार १३४ शेतकऱ्यांच्या ६ लाख ११ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित सर्व पंचनामे येत्या रविवारपर्यंत १०० टक्के पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले आहेत.
कसा असेल केंद्रीय पथकाचा दौरा?
शुक्रवार: अहिल्यानगरचा दौरा आटोपून पथक संध्याकाळी सोलापूर शहरात दाखल होईल. जिल्हाधिकारी कार्यालयात भूजल पातळी, विहिरींची स्थिती, पिकांचे नुकसान, चारा टंचाई आणि मनरेगा कामांचा आढावा घेण्यासाठी प्रशासनासोबत महत्त्वाची बैठक पार पडेल. यानंतर बार्शी व उत्तर सोलापूर तालुक्यातील पिकांची पाहणी केली जाईल.

शनिवार: पथकातील अधिकारी दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार असून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
पथकातील प्रमुख अधिकारी: डॉ. के. पोन्नुस्वामी (संचालक, पीक विभाग), अब्बास अहमद खान (पेयजल व स्वच्छता विभाग) आणि सुमित शर्मा (अन्न व औषध प्रशासन विभाग).

मदत कधी आणि किती मिळणार?
अहवाल सादरीकरण: जिल्हा प्रशासनाचा अंतिम अहवाल सोमवारी राज्य शासनाला सादर केला जाईल. त्यानंतर राज्य शासनाच्या मंजुरीनंतर दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष मदत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मदतीची प्रक्रिया: केंद्रीय पथक वस्तुनिष्ठ मूल्यमापनाचा गोपनीय अहवाल केंद्र सरकारला पाठवेल. आंतर-मंत्रालयीन समितीच्या मंजुरीनंतर NDRF कडून निधी राज्य शासनाकडे वर्ग होईल.
NDRF च्या निकषांनुसार संभाव्य हेक्टरी मदत:
जिरायती पिके: ₹१३,६०० प्रति हेक्टर
हंगामी बागायती पिके: ₹२७,००० प्रति हेक्टर
बागायती पिके: ₹३६,००० प्रति हेक्टर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











