मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
सोलापूर जिल्ह्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिक आधीच पाण्यासाठी हैराण आहेत. त्यातच आता महावितरणच्या भारनियमनामुळे सोलापूरकरांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे.

जिल्ह्यात वाढत्या उकाड्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे; मात्र वीजटंचाईचे संकट उभे राहिल्याने ग्रामीण भागात दिवसातून दोन ते चार तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, महावितरणकडून वीज गळती आणि थकबाकी वसुलीच्या प्रमाणानुसार ग्रामीण भागाचे वर्गीकरण करून चार टप्पे करण्यात आले आहेत. या टप्प्यांनुसार विविध भागांत दैनंदिन २ ते ४ तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ऐन दुष्काळात आणि वाढत्या तापमानात भारनियमन सुरू झाल्याने शेतीचे सिंचन, पिण्याच्या पाण्याचा उपसा आणि नागरिक, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात ऐन उकाड्यात ट्रिपिंगचा त्रास
दुसरीकडे, सोलापूर शहरात व जिल्ह्यात अधिकृत भारनियमन नसले तरी तांत्रिक अडचणी, दुरुस्ती आणि अन्य कारणांचे निमित्त पुढे करत दररोज सातत्याने वीजपुरवठा खंडित केला जात आहे. वाढत्या उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असताना शहरात विजेचा हा ‘लपंडाव’ सुरू असल्याने नागरिक, व्यावसायिक आणि लघुउद्योग त्रस्त झाले आहेत.

अधिकारी फोन उचलेना अन् काहींचे फोन लागेना…
विजेच्या समस्येबाबत प्रतिक्रिया विचारण्यासाठी लोकमतच्या प्रतिनिधीने महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने व शहराचे कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांना मोबाइलवर संपर्क साधला असता माने यांनी फोन उचलला नाही, तर इदाते यांचा संपर्क होऊ शकला नाही, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगण्यात येत होते.

तापमान वाढले… वीजवापरही वाढला…
सध्या सोलापूरचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले आहे. ऐन पावसाळ्यात विजेचा वापर कमी होण्याऐवजी वाढत्या उन्हामुळे वाढला आहे. एसी, पंखे, कुलरचा वापर वाढला आहे. पाण्याच्या टंचाईमुळे शेतीपंपाचा वीजपुरवठा ८० टक्के बंद अवस्थेत असतानाही भारनियमन व सतत खंडित होत असलेल्या विजेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
वारंवार वीज जात असल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात आणि ढिसाळ नियोजनावर सोलापूरकर ग्राहकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महावितरणने वीजटंचाईवर तातडीने उपाययोजना करून अखंडित वीजपुरवठा सुरू करावा.-शाम कदम, संभाजी ब्रिगेड
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











