mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2026
in मंगळवेढा
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

टीम मंगळवेढा टाईम्स । प्रतिनिधी

माझ्या मतदार संघातील तीव्र दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, फळबागांसाठी हेक्टरी किमान १ लाख २५ हजार रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करावे आणि दुष्काळ अनुदान दिवाळीपूर्वी वितरित करावे, अशा १७ मागण्यांचे निवेदन मंगळवेढा येथे पाहणी दौऱ्यासाठी आलेल्या केंद्र सरकारच्या आंतरमंत्रालयीन पथकाकडे आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.

माझ्या मतदार संघातील पावसाअभावी शेती संकटात सापडली असून, अनेक शेतकऱ्यांना पेरणी करता आलेली नाही. उभी पिके, ऊस आणि डाळिंबासह विविध फळबागांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतजमिनीचा सरसकट पंचनामा करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

पेरणी न झालेल्या क्षेत्रालाही नुकसानभरपाई द्यावी, ई-पीक पाहणीची सक्ती शिथिल करावी आणि सातबारा उतारा, स्वयंघोषणापत्र व प्रत्यक्ष क्षेत्र पडताळणीच्या आधारे मदत निश्चित करावी, पिके वाचविण्यासाठी खासगी टँकरवर केलेला खर्च तसेच उत्पन्नातील घट विचारात घेऊन भरपाई देण्यात यावी.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवून पीककर्जाची पुनर्रचना करावी, कर्जमाफीची अंमलबजावणी करावी आणि जनावरांसाठी चारा डेपो किंवा छावणी तात्काळ चालू करावी तसेच  कृषी व घरगुती वीजजोडण्या खंडित करू नयेत.आणि शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यात द्यावी,

भोसे व ४० गावे, कासेगाव,आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची थकीत वीजबिले व पाणीपट्टी माफ करून दुष्काळ संपेपर्यंत मोफत वीज व पाणी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

तालुका स्तरावर स्वतंत्र दुष्काळ निवारण केंद्र स्थापन करावे, रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करून स्थलांतर रोखावे आणि दुर्गम वाड्या-वस्त्यांपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी  निवेदनात आहे.

याशिवाय कृष्णा-माण -भीमा नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य द्यावे, अतिरिक्त पाणी मंगळवेढ्याकडे वळविण्याचा विचार करावा आणि भीमा व माण नदीवरील जुन्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या जागी आधुनिक स्वयंचलित बॅरेज उभारण्यासाठी निधी द्यावा, असेही नमूद करण्यात आले आहे.

पाऊस न झाल्यामुळे यावर्षी मंगळवेढा शिवारात  जवळपास 15 हजार हेक्टरवर पेरणी होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी लागणार असून आंधळगाव लेंडवे चिंचाळे , गोणेवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पावसाअभावी जळू लागलेल्या पिकांची पाहणी केंद्रातून आलेले केंद्रीय पथकातील आलेल्या अधिकारी व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारीयांच्या समवेत पाहणी केली.

दिवाळीपूर्वी दुष्काळ अनुदानाचे वाटप करून शेतकरी कुटुंबांना दिलासा द्यावा. केंद्राच्या पथकाने १७ मागण्यांचा आपल्या अहवालात समावेश करून दुष्काळग्रस्तांना सर्वसमावेशक मदत मिळण्यासाठी शासनाकडे ठोस शिफारशी कराव्यात अशी विनंती आमदार समाधान आवताडे यांनी केंद्रीय पथकाकडे केली आहे.

यावेळी अफसर खान,सुमित शर्मा,जिल्हा कृषी अधिकारी भोसले साहेब, उप जिल्हाधिकारी अभिजीत पाटील,प्रांताधिकारी माळी सो. तहसीलदार जाधव साहेब तालुका कृषी अधिकारी मिसाळ मॅडम, पोलीस निरीक्षक बोरिगिड्डे, गटविकास अधिकारी  शेख मॅडम, सभापती दिपाली ताड उपसभापती अर्जुन मल्हाळे, उपनगराध्यक्ष भगत सर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, रमेश भांजे, सौ करुणाताई शिवशरण, पंचायत समिती सदस्य विनायक यादव, बाळासाहेब ताड आदी मान्यवर उपस्थित होते

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा