mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सरकार चालवायला दम लागतो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थिल्लर, फडणवीसांचा हल्लाबोल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 19, 2020
in राजकारण, सोलापूर

राज्यात सरकार चालवयाला दम लागतो, तो त्यांच्यात नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थिल्लर आहेत असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.ते सोलापुरात बोलत होते. It takes breath to run a government;  Chief Minister Uddhav Thackeray Thiller, Fadnavis’s attack

अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यात माढा आणि करमाळा तालुक्‍यातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी अकोला (ता. माढा) येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर हल्लाबोल केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे.आता लोकांना मदतीची गरज आहे, अशा वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याऐवजी त्यांनी हिम्मत असेल तर शेतकऱ्यांना मदत करावी.

केंद्र सरकारने कर्ज काढून राज्याच्या जीएसटीचे पैसे दिले आहेत, असे सांगून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्र सरकारकडे 60 हजार कोटींचा जीएसटी थकल्याच्या आरोपाचे खंडन केले.

राज्यावर 50 हजार कोटींचे कर्ज आहे. आणखी 70 हजार कोटी काढण्याची राज्याकडे क्षमता आहे, असे सांगत कर्ज काढा; पण शेतकऱ्यांना मदत करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आम्ही केंद्र सरकारच्या मदतीची वाट न बघता शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत केली होती. आता केंद्राची वाट का? असा सवाल उपस्थित करत अर्थमंत्री अजित पवार हे दिशाभूल करत आहेत, असा आरोप ही त्यांनी केला.

यावेळी खासदार जयसिध्देश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर,आमदार सुभाष देशमुख, आ.विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, चेतन केदार, राजाभाऊ जगदाळे आदीजण उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचा फडणवीस यांना टोला! बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा केंद्राकडे मदत मागावी

भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये निवडणुकीचा प्रचार करण्यापेक्षा राज्यातील पूरग्रस्तांना मदत मिळावी या हेतूने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करावी, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापुरातील पत्रकार परिषदेत लगावला.

मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर तर पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, पुण्यातील काही भागांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. या बळिराजाच्या डोळ्यात पाणी आले असून अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.

त्यांनी काय मागण्यापेक्षा, त्यांना काय देता येईल याकडे सरकारचे लक्ष आहे. विरोधकांनी यामध्ये राजकारण न आणता पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी केंद्राकडून काय मदत मिळवता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप न करता सर्वांनी एकत्रित येऊन मदतीची मागणी करावी, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही केंद्र सरकारकडे मदतीची अपेक्षा केली आहे. केंद्र सरकारने ही मदत देण्याची ग्वाही दिली असून विरोधकांनी राज्य सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा केंद्राकडून ही मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

विरोधक हे आपल्याच राज्यातील असून परराज्यातील वा परदेशातील नाहीत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत लगावला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Chief Minister Uddhav Thackeray Thiller It takes breath to run a government Fadnavis attackIt takes breath to run a government Chief Minister Uddhav Thackeray Thiller Fadnavis's attack

संबंधित बातम्या

पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

दसरा-दिवाळी दरम्यान ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार ‘या’ तारखेची मतदार यादी

July 18, 2026
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026
Next Post

Breaking! प्रशासनात पुन्हा मोठे फेरबदल 'या' आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाचा संपूर्ण यादी

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात सुन्न करणारी घटना! ११ वर्षांच्या चिमुरडीने शेतात जाऊन संपवलं जीवन; कारण…

July 18, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

दसरा-दिवाळी दरम्यान ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार ‘या’ तारखेची मतदार यादी

July 18, 2026
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..