टीम मंगळवेढा टाईम्स। प्रतिनिधी
रतनचंद शहा सहकारी बँकेच्या मंगळवेढा शाखेकडून कर्ज थकबाकीप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे सील तोडून अनधिकृतपणे प्रवेश केल्याचा प्रकार वेळापूर (ता. माळशिरस) येथे उघडकीस आला आहे.

याप्रकरणी बँकेचे अधिकृत अधिकारी दीपक आदाने यांच्या फिर्यादीवरून रामदास आबासाहेब देशमुख व शुभांगी रामदास देशमुख यांच्याविरुद्ध वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदास देशमुख व शुभांगी देशमुख यांनी रत्नचंद शहा सहकारी बँकेच्या मंगळवेढा शाखेकडून ४४ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

मात्र, कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने कायदेशीर प्रक्रिया राबवत ‘वित्तीय मालमत्तेचे संपादन व पुनर्रचना आणि तारण हक्काची अंमलबजावणी कायदा २००२’ (सरफेसी कायदा) अंतर्गत कारवाई केली होती.

दरम्यान, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास बँकेचे शाखाधिकारी राजेंद्र माने हे मालमत्तेची पाहणी करण्यासाठी गेले असता, मालमत्तेवरील सील तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे बँक प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने पोलिसांत धाव घेतली.

बँकेचे अधिकृत अधिकारी दीपक आदाने यांनी वेळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी संबंधित दाम्पत्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज








