टीम मंगळवेढा टाईम्स :
लक्ष्मी दहीवडी (ता. मंगळवेढा) येथील शेतकरी अजयकुमार शिंदे (वय ४०) हे घरातून गावात जातो असे सांगून निघून गेल्यानंतर संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

दरम्यान, त्यांना अज्ञात कारणावरून कुणीतरी पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत त्यांची पत्नी वैशाली शिंदे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

गावात जाऊन येतो म्हणून निघाले अन् परतलेच नाहीत
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी दहीवडी येथील रहिवासी वैशाली अजयकुमार शिंदे (वय ३४) या आपली सासू अंजना, पती अजयकुमार आणि दोन मुलांसह एकत्र कुटुंबात राहतात. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर अवलंबून आहे.
२ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे २:३० वाजण्याच्या सुमारास अजयकुमार हे पत्नीला “गावात जाऊन येतो” असे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र, रात्री ९ वाजून गेले तरी ते घरी परतले नाहीत.

नातेवाईकांकडून कसून शोध; अखेर पोलिसांत धाव
पती घरी न आल्याने चिंतेत पडलेल्या पत्नी वैशाली शिंदे यांच्यासह नातेवाईक विजयकुमार शिंदे, हणमंत पाटील व मारुती वनखंडे यांनी तात्काळ परिसर, आजूबाजूची गावे आणि परगावी असणाऱ्या नातेवाईकांकडे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कसून शोध घेतला. मात्र, अजयकुमार यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.

कोणतीही माहिती समोर न आल्याने अखेर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्यांना पळवून नेल्याची फिर्याद मंगळवेढा पोलिसांत देण्यात आली आहे. या घटनेमुळे दहीवडी परिसरात उलटसुलट चर्चा सुरू असून मंगळवेढा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









