गेले काही दिवस आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सरकारने सपाटा लावला असताना काल सोमवारी रात्री आणखी १५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. या निमित्ताने काही अधिकाऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. state administration is the transfer of IAS officers, read the full list
प्रवीण दराडे, पल्लवी दराडे हे आयएएस दाम्पत्य, जयश्री भोज, अश्विनी जोशी, डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, चंद्रकांत डांगे, सुधाकर शिंदे आदींचा बदली झालेल्यांमध्ये समावेश आहे. एक महिन्यात पुन्हा बदली झालेली काही नावे देखील या यादीत आहेत.
राज्यातील डझनभर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून नागपूरहून परतलेले तुकाराम मुंढे मात्र अद्याप पदाची प्रतीक्षा करीत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळच्या मानल्या जाणाऱ्या दराडे दाम्पत्याला मुंबईत पदे मिळाली असून अश्विनी जोशी यांना पेट्रोलियम संचनालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सी के डांगे, संचालक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई रिक्त पदावर काम करतील.
ए आर काळे यांची नियुक्ती आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन मुंबई या पदावर डॉक्टर एम एस कळशेट्टी,
संचालक जल सर्वेक्षण विकास यंत्रणा पुणे या पदावर तर डॉक्टर अश्विनी जोशी यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित मुंबई या पदावर झाली आहे.
प्रवीण दराडे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ मुंबई या पदावर
तर त्यांच्या रेव्हेन्यू सेवेत असलेल्या पत्नी श्रीमती पल्लवी दराडे यांची नियुक्ती सहसचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई अपील आणि सुरक्षा या रिक्त पदावर झाली आहे.
मुंबई महापालिकेत काही काळ काम केलेल्या श्रीमती जयश्री भोज यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मुंबई या पदावर झाली आहे.
महेंद्र वारभुवन यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी महात्मा फुले जन आरोग्य योजना मुंबई या पदावर
तर एच पी तुम्मोड यांची नियुक्ती आयुक्त दुग्धविकास मुंबई या रिक्त पदावर आर बी भोसले यांची नियुक्ती जिल्हाधिकारी अहमदनगर या पदावर
तर डॉ. के एच कुलकर्णी, संचालक, नगर परिषद प्रशासन, मुंबई या पदावर करण्यात आली
दरम्यान पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्याही अद्याप प्रलंबित आहेत.
काही दिवसांपूर्वीच राज्य प्रशासन सेवेतून भारतीय प्रशासन सेवेत (आयएएस) पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले.
त्यानुसार अहमदनगर जिल्हाधिकारीपदी राजेंद्र भोसले यांची तर अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी अभिमन्यू काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Another major reshuffle in the state administration is the transfer of IAS officers, read the full list
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज