मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील मोकळया मैदानात बैल व घोडा शर्यतीच्या बैलगाडीशी जुंपून शर्यत लावण्याची तयारी केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Attempting to take a bullock cart race on mangalwedha; Crime against four
याप्रकरणी धोंडीराम आकाराम चोपडे (हुन्नूर) , बंडू अशोक चोरमले (नंदेश्वर) व इतर दोन अज्ञात या चौघांविरूध्द प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदयानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची हकिकत अशी दि.१९ रोजी सकाळी ७.३० च्या दरम्यान नंदेश्वर ते रड्डे जाणाऱ्या रोडवरील मोकळे पटांगणात आरोपी गरांडे तसेच धोंडीराम आकाराम चोपडे ( हुन्नूर ) , बंडू अशोक चोरमले ( नंदेश्वर ) आदीजण बैलगाडी व घोडा गाडी शर्यत लावण्याच्या उद्देशाने तयारीत असताना १० ते १५ लोक व चार शर्यतीच्या चौघांविरूध्द उभ्या व राज्य करण्यात बैलजोडया बैलासह असलेल्या स्थितीत पोलिसांना मिळून आल्या.
याची फिर्याद पोलिस शिपाई राजकुमार आवटे यांनी दिली आहे.दरम्यान सर्वोच्च न्यायालय शासनाकडून पाळीव प्राण्यांच्या शर्यतीस बंदी असतानाही येथे बैलगाडीची शर्यत घेण्याचा प्रयत्न आला आहे.
मागील महिन्यातही रड्डे येथे बैलांच्या शर्यती घेण्याचे प्रयत्न झाले होते.पोलिस अचानक घटनास्थळी पोहोचल्याने होणाऱ्या शर्यती टळल्या होत्या. या बैलाच्या शर्यती प्रकरणात एका आरोपीचे केवळ आडनाव फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पूर्ण नाव फिर्यादीत नमूद न करण्याचे गौडबंगाल नेमके काय ? अशी चर्चा सुरु झाली आहे.याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार संजय राऊत हे करीत आहेत.
Attempting to take a bullock cart race on mangalwedha; Crime against four nandeshwar
बंगला विकणे आहे.
मंगळवेढा शहरात ३००० चौ.फूट एन.ए.प्लॉट , साधारण ५०० चौ.फूट मध्ये आर.सी.सी. वन बी.एच.के. बांधकाम,बोअरचे मुबलक पाणी , ज्ञानदीप शाळेपासून फक्त ५०० फुट अंतरावर , अपार्टमेंट , बँक , हॉस्पिटल , हॉलसाठी उपयुक्त ठिकाण , कारखाना रोडपासून दोन नंबरचा प्लॉट , दोन रोडटच कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास त्वरीत विकणे आहे.
संपर्क:मो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९
राज्यातील व देशातीलब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वातप्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज