टीम मंगळवेढा टाईम्स ।
मी घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांनी मनापासून स्वीकारला यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानतो, हा सगळा विजय मतदार व कार्यकर्त्यांनी खेचून आणला आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मतदार व आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
भारतीय जनता पार्टी व महायुतीने गेल्या अडीच वर्षांमध्ये या मतदारसंघांमध्ये जी काम केले समाधान आवताडे यांनी तीन वर्षांमध्ये भरघोस निधी खेचून आणला व त्यांना पुन्हा पक्षाने संधी दिली.
पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर मी राहणार असल्याचे मी आधीच जाहीर केले होते. आजच त्याच पद्धतीने माझ्या सर्व सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून समाधान आवताडे यांचा दुसऱ्यांदा यश खेचून आणले आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो.
प्रशांत परीचारका मंत्रिमंडळात दिसतील का? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर परिचारक म्हणाले.. भाजप असा पक्ष आहे की, इथे काय मिळेल काय मिळणार नाही याचा विचार न करता असंख्य कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करतात.
सगळ्यांनाच मंत्रिपद मिळेल असे काही नाही त्यामुळे पक्षाने दिलेला आदेश महत्त्वाचा असतो. या निवडणुकीमध्ये महायुतीचे सरकार सत्तेत येणे हे खूप महत्त्वाचे होते. जी पक्षाने जबाबदारी सोपवली होती ती पार पाडले असल्याचे परिचारक यांनी सांगितले..
2009 ची पुनरावृत्ती होईल असे मतदारांना वाटत नव्हतेच केवळ विरोधकांनी अशी अफवा पसरवून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज