टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले असून महायुतीने दणदणीत विजय मिळवला असून महाविकास आघाडीला मात्र पराभवाचे तोंड बघावे लागले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत.
तर महाविकास आघाडीला मात्र 50 जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. अशातच अनेक पराभूत उमेदवारांना आपला पराभव पचवता आलेला नाही, त्यामुळे काहींनी फेरमोजणीची मागणी केलेली दिसून येत आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात असाच प्रकार समोर आला आहे. मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप काशिनाथ धोत्रे यांनी आपल्याला मतदान कमी कसे झाले? अशी शंका निर्माण करत व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी करावी, असा विनंती अर्ज निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केला होता. हा अर्ज फेटाळण्यात आला आहे.
दिलीप काशिनाथ धोत्रे यांनी आपल्याला मतदान कमी कसे झाले? अशी शंका उपस्थित करत व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी करावी असा विनंती अर्ज निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केला होता.
परंतु विजयी उमेदवार आणि अर्जदार उमेदवार यांच्या दरम्यान मतांची तफावत लक्षणीय अधिक आहे. ज्याअर्थी 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघातील मतदानाची ईव्हिएम मतदान यंत्राद्वारे मोजणी करण्यात आली असून त्यात चुका संभवत नाहीत. मतमोजणीमध्ये कोणताही दोष अथवा ठोस कारण निदर्शनास आणले गेले नाही.
असे सांगत निवडणुक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिलीप धोत्रे यांची मागणी अमान्य केली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात चौरंगी लढत बघायला मिळाली असली तरी खरी लढत भाजपचे समाधान आवताडे व काँग्रेसचे भगीरथ भालके यांच्यामध्येच झाली आहे. या लढतीत भाजपचे समाधान आवताडे यांनी बाजी मारली आहे. तर दिलीप काशिनाथ धोत्रे चौथ्या स्थानावर राहिले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज