mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सावध व्हा! ‘फ्री गिफ्ट व्हाउचर’च्या आमिषाने ४० हून अधिक जोडपे फसले; ​परदेशवारीच्या नावाखाली दाम्पत्यांना लाखोंचा चुना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 12, 2026
in राज्य
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

परदेशात वाढदिवस साजरा करण्याचे स्वप्न, आलिशान रिसॉर्टमध्ये सुट्या घालवण्याचे आश्वासन आणि दरमहा केवळ १८०० रुपयांचा हप्ता. या आकर्षक ऑफर्सच्या आमिषाला भूललेल्या साताऱ्यातील ४० हून अधिक दाम्पत्यांना लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.

संबंधित कंपनीने सेमिनारच्या माध्यमातून ग्राहकांना मेंबरशिप घेण्यास प्रवृत्त करून फसवणूक केल्याची तक्रार असून, न्यायासाठी तक्रारदारांनी आता थेट पोलिस महासंचालकांकडे धाव घेतली आहे.

साताऱ्यातील एका अलिशान हाॅटेलमध्ये २०२३ ला एका कंपनीने सेमिनार आयोजित केला होता. या सेमिनारमध्ये साताऱ्यातील पन्नासहून अधिक दाम्पत्य हजर होते.

या दाम्पत्याला तुम्ही कोठेही फिरत नाही. तुम्हाला आमच्या कंपनीकडून गिफ्ट व्हाउचर लागले आहे. हे व्हाउचर भरल्यानंतर तुम्हाला पाच वर्षे फक्त १८०० रुपये महिन्याला भरायचे आहेत.

एक महिन्यानंतर पैसे परत देऊ” असे आश्वासन देण्यात आले.

या आश्वासनाला भुलून सेमिनारला आलेल्या दाम्पत्यांनी मेंबरशिप बूक केली. दोन-तीन वर्ष काहींनी पैसे भरले. मात्र, ऐनवेळी कंपनीचा संपर्क बंद झाला.

साताऱ्यातील काही एजंटांशी तक्रारदार दाम्पत्यांनी संपर्क साधला असता संबंधित कंपनी ठाण्यातील असल्याचे समोर आले. यानंतर अनेक जण ठाण्याला गेले.

मात्र, संबंधित कंपनीचे शटर महिनोन्महिने बंद असल्याचे त्यांना समजले. आपण पुरते फसलो गेलो, याची जाणीव झाल्यानंतर तक्रारदारांनी साताऱ्यापासून ठाणे पोलिस आयुक्तालयात तक्रार अर्ज दिले; परंतु अद्यापही त्यांची कोणी दखल घेतली नाही.

नेमकं कसं फसवलं गेलं

अनेक दाम्पत्यांना हेरून त्यांना महिलांकरवी फोन करण्यात आले. तुम्हाला गिफ्ट व्हाउरच लागले आहे, असे सांगून सेमीनारमध्ये पती-पत्नीला येणे बंधनकारक करण्यात आले. तेथे गेल्यानंतर एकट्या महिलेचा ब्रेन वाॅश केला जायचा. तुमच्या लग्नाचा वाढदिवस परदेशात साजरा करा. तुम्ही कुठेही फिरत नाही.

पतीला परदेशात घेऊन जाण्याची हीच संधी आहे. अशी वेगवेगळी आमिषे दाखवून पत्नीला वश केले जायचे. त्यानंतर पत्नीच्या सांगण्यावरून पती लगेच मेंबरशिप घेण्यास तयार व्हायचे. अशा प्रकारे सेमिनारला आलेल्या ४० हून अधिक जोडप्यांनी त्या ठिकाणी मेंबरशिप केल्याचे तक्रारदार विकास कदम सांगत आहेत.

कुटुंब उद्ध्वस्त

या फसवणुकीमुळे कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. काहींना क्रेडिट कार्डचे हप्ते फेडण्यासाठी पत्नीचे मंगळसूत्र आणि इतर दागिने बँकेत तारण ठेवावे लागले. काही कुटुंबांना शेतीशिवाय दुसरे उत्पन्न नसल्याने मुलांचे शिक्षणही अडचणीत आले आहे.

म्हणे तुमच्यासारखे अनेक जण चाैकशीला येतात

या कंपनीच्या कार्यालयात चौकशीला गेलेल्या अनेक जिल्ह्यातील लोकांना ‘तुमच्यासारखे अनेक जण चौकशीला येतात’ असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याचे तक्रारदार सांगत आहेत. त्यामुळे फसवणुकीची व्याप्ती कोट्यवधींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.

सांगितले एक; पण करारनामा भलताच..

संबंधित कंपनीने इंग्लिश भाषेत असलेला करार लोकांकडून करून घेतला. मात्र, करार न वाचता अनेकांनी स्वाक्षरी केली. त्यामध्ये कंपनीची केवळ मेंबरशिप घेतली, असा उल्लेख आहे. त्यामध्ये कुठेही तुम्हाला फिरण्यासाठी मोफत परदेशवारी असा उल्लेख नसल्याचे समोर आले.

माझ्याकडून १ लाख १२ हजार रुपये क्रेडिट कार्डवरून घेतले आहेत. एक महिन्यानंतर कंपनीच्या कार्यालयात फोन लावला असता तो बंद लागला. संचालकांनी फोन उचलणे बंद केले आणि नंबर ब्लॉक केले. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिसवर गेलो असता ठाण्यातील तिन्ही कार्यालये बंद असल्याचे दिसले. – विकास कदम, तक्रारदार, खेड, सातारा.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: परदेशवारी फसवणूक

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 13, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
Next Post
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको! शिक्षण विभागाचे 'ते' दोन्ही आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 13, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

दुष्काळाची चिंता मिटली! ‘या’ तारखे दरम्यान धो-धो पावसाची शक्यता; हवामान अभ्यासकांचा ‘हा’ अंदाज उडवेल झोप

September 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा