मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
मराठा आरक्षण आणि समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडे जेवढे पर्याय होते तेवढे आम्ही केले, आता आमचे शिष्टमंडळ जरांगे यांच्याकडे जाणार नाही, अशी भूमिका मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली आहे.

यावर जरांगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. गोडगोड बोलून तुम्ही मराठयांचे वाटोळे केले आणि आता पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही, असे ठणकावत त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे मराठा आंदोलन अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आरपारच्या लढाईची घोषणा करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे तसेच त्यांनी मुंबईत आंदोलन करू नये यासाठी जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवरून मागील काही दिवसांपासून सुरू आहेत.

त्यात आता अचानक विखे-पाटील यांनी यापुढे जरांगे यांच्याकडे शिष्टमंडळ जाणार नाही. आता त्यांनीच सरकारला समजून घ्यावे, अशी भूमिका मांडली आहे.
त्यावर जरांगे यांनी सरकारला समजून घ्यायला सरकार काय आमचा बाप आहे का? मराठय़ांचे वाटोळे करायला उपसमितीचे अध्यक्ष झालात का? विखे पाटील यांच्याकडे जोपर्यंत मराठा उपसमितीचा आणि मंत्रिमंडळाचा शिक्का आहे, तोपर्यंत त्यांना मराठय़ांचे काम करावेच लागेल, अशा शब्दांत जरांगे यांनी विखे पाटील आणि राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार निशाणा साधला.

ठोस निर्णयाच्या दिशेने पुढे या
मराठा समाजाच्या मागण्यांचा मोठा भाग अद्याप प्रलंबित असताना सरकारने पर्याय संपल्याचे सांगणे योग्य नाही. सरकारने चर्चा थांबवली तरी मराठा समाजाच्या आंदोलनावर त्याचा परिणाम होणार नाही. सरकारला चर्चा करायची असेल तर ठोस निर्णयाच्या दिशेने पुढे यावे, असे जरांगे म्हणाले.
गोड बोलून फडणवीसांचे स्वप्न विखेंनी पूर्ण केले
फडणवीस यांनी विखेंना आमच्यात घातले, गोड बोलून आमचे एक वर्ष वाया घालवले आणि मराठय़ांचे वाटोळे करण्याचे फडणवीसांचे स्वप्न विखेंनी पूर्ण केले. वेळ पडल्यास विखेंनी राजीनामा देऊन फडणवीसांनाही सोडायला पाहिजे होते, पण ते तसे करणार नाहीत. कारण ते केवळ पैशाच्या आणि मोठय़ांना मॅनेज करण्याच्या जिवावर राजकारण करतात, अशी टीका जरांगेंनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















