मंगळवेढा टाईम्स न्युज नेट्वर्किंग।
यंदाच्या गणेशोत्सवात एक दुर्मिळ योग जुळून आला असून १४ सप्टेंबर रोजी हरितालिका तृतीया आणि श्रीगणेश चतुर्थी हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होणार आहेत.
सकाळी ७:०७ वाजेपर्यंत तृतीया असून त्यानंतर चतुर्थी सुरू होत असल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी लोकमतशी बोलताना दिली.

हरितालिकेसाठी शास्त्रानुसार सूर्योदयव्यापिनी तृतीया, तर गणेश चतुर्थीसाठी मध्यान्हकाल व्यापिनी चतुर्थी आवश्यक असते. त्यामुळे दोन्ही व्रते १४ सप्टेंबर रोजीच केली जातील.

सकाळी ७:०७ च्या आधी किंवा नंतरही सोयीनुसार हरितालिका पूजन व पार्थिव गणपतीची स्थापना करता येईल. पहाटे ४:५० ते दुपारी १:५१ या वेळेत कोणत्याही भद्रादी कुयोगाचा विचार न करता सोयीनुसार गणेशस्थापना करता येईल.

दरम्यान, याआधी सन २००६, २००९ मध्ये हरितालिका व गणेश चतुर्थी एकाच दिवशी आलेले होते. तसेच सन २०१७ मध्ये १२ दिवसांचा गणेशोत्सव आलेला होता असेही दाते यांनी सांगितले.

गौरी आगमन १७ सप्टेंबर (सायंकाळी ७:५४ पर्यंत)
गौरी पूजन : १८ सप्टेंबर (दिवसभरात नेहमीप्रमाणे)
गौरी विसर्जनः १९ सप्टेंबर (दिवसभरात कधीही)
पुढच्या वर्षी खरंच बाप्पाचं लवकर आगमन होणार
यापूर्वी २००६ आणि २००९ मध्ये असा योग आला होता, तर २०१७ मध्ये १२ दिवसांचा गणेशोत्सव झाला होता. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या आग्रहाला मान देऊन बाप्पा पुढील वर्षी ४ सप्टेंबर २०२७ रोजी आगमन करणार आहेत.
विसर्जन शास्त्राप्रमाणेच करावे.
२५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने यंदाचा गणेशोत्सव १२ दिवसांचा असणार आहे. गणेशमूर्तीचे घरातील बादली, टँक किंवा तलावात विसर्जन करता येते. मूर्ती शाडूची किंवा मातीची असावी. तसेच, घरात गर्भवती स्त्री असताना विसर्जन करू नये ही प्रथा चुकीची असून विसर्जन शास्त्राप्रमाणेच करावे.- मोहन दाते, पंचांगकर्ते
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













