मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यातील शेतकरी आणि विद्यार्थी वर्गाला सध्याचे भाजपप्रणीत सरकार पूर्णपणे नको झाले आहे. जनमानसात सरकारविरोधात तीव्र रोष खदखदत असून, सर्वांनी एकत्र येऊन या अहंकारी सत्तेला चोख उत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे.

भाजपच्या विचारसरणीचे आमदार निवडून न देण्याचा ठाम निर्धार आता जनतेने केला आहे असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी दिला.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा कोमल ढोबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पल्लवी पाटील, तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर रणे, शहराध्यक्ष सचिन नागणे, उद्योजक राहुल ताड, माजी नगराध्यक्ष भारत नागणे, पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, युवक अध्यक्ष संग्राम माने, शिक्षक नेते सिद्धेश्वर धसाडे, साहेबराव पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून आमदार रोहित पवार यांनी कोणताही सत्कार स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.

५ हजारात दिवाळी कशी साजरी होणार?
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारचा समाचार घेताना रोहित पवार म्हणाले, “दुष्काळ आणि संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारने केवळ ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

५ हजार रुपयात शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार? ही सर्वसामान्य जनतेची क्रूर थट्टा आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याची सत्ताधारी आमदारांची हिंमत होत नाही. ही मदत तुटपुंजी आहे असे सांगायला एकही आमदार पुढे येत नाही.
मात्र, आम्ही विरोधी पक्षात राहूनही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडत आहोत.”
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या एकजुटीचा विजय
स्पर्धा परीक्षा व शिक्षक आंदोलनाचा उल्लेख करत पवार म्हणाले, “राज्यात पैसे फेकून अधिकारी बनवले जात असल्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी मोठे जनआंदोलन उभे केले, त्याला मोठे यश आले.
दुसरीकडे शिक्षकांचे आंदोलन सुरू असताना अहंकारी सरकारने त्यांच्या मागण्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही. मात्र, शिक्षकांनी एकजूट दाखवली आणि आम्ही ठाम पाठिंबा दिल्याने अखेर हा प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे आता पदवीधर आणि शिक्षकांनी आपले खरे प्रतिनिधी सभागृहात पाठवणे गरजेचे आहे.”
या मेळाव्यात हर्षदा देशमुख-जाधव आणि प्रा. जयंत आसगावकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










