टीम मंगळवेढा टाईम्स ।
यावर्षी पावसाच्या प्रमाण कमी असल्यामुळे तसेच Al Nino च्या प्रभावामुळे संपूर्ण भारतात दुष्काळग्रस्त स्थिती आहे. खासकरून महाराष्ट्रात याचे पडसाद अधिक उमटताना दिसून येत आहेत. आधी महाराष्ट्रातील एकूण 265 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले होते.
आता या यादीत नव्या 40 तालुक्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. एकंदरीत आता राज्यातील एकूण 305 तालुके दुष्काळग्रस्त आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक आधार म्हणून मदतीचा हात दिला आहे.

शेतकऱ्यांना मिळणार 5 हजार रुपयांची आर्थिक मदत
राज्यातील या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना सरकारकडून 5000 रुपयांची मदत मिळणार आहे. या योजनेची घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 14 ऑक्टोबर 2026 रोजी केली होती. राज्यात दुष्काळाचे सावट पसरल्यामुळे शेतकऱ्यांना तातडीचा आधार देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ही पाऊलं उचलली आहेत.
गेल्या 19 ऑक्टोबरपासून संबंधित शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळण्यास सुरुवात झाली असल्याचे काही वृत्तांचे म्हणणे आहे. मुळात राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणारी 5 हजार रुपयांची रक्कम आगाऊ मदत आहे. संपूर्ण नुकसानभरपाई नाही.

शेतकऱ्यांना इतर सुविधांचा लाभही मिळेल
या कठीण काळात राज्यातील शेतकऱ्यांना आधार म्हणून 5000 रुपयांच्या आर्थिक मदतीसह इतर काही सवलतीही देण्यात आल्या आहेत. अशा शेतकऱ्यांना कर्ज पिढीच्या मदतीत बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर जमीन महसुलात सवलत देण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना विज बिलात सवलत देण्याची तरतूद आखण्यात आली आहे.

तर पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना मदत म्हणून शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे तसेच जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या दुष्काळ काळात शेतकऱ्यांवर कर्ज वसुलीचा दबाव टाकण्यावर सक्त मनाई आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभही एकत्र मिळू शकतो
मुळात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना वरील योजनेपासून स्वतंत्र योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची मदत केली जाते. हि मदत शेतकऱ्यांना दोन-दोन हजारांच्या तीन टप्प्यात करण्यात येते.

यंदाच्या चालू वर्षातील दोन हफ्ते येणे अद्याप बाकी आहेत. यामुळे एकंदरीत येत्या काळात राज्यातील दुष्काळग्रस्त परिसरातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 5000 रुपयांसह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून प्रलंबित 4000 रुपयांची रक्कमही मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना दोन्हीही मदती मिळून एकूण 9000 रुपयांची रक्कम सोबत मिळू शकते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














