टीम मंगळवेढा टाईम्स ।
भावाला राखी बांधण्याच्या ओढीने पुण्याहून मूळ गावी येत असताना झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या २२ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

तब्बल ५० दिवस मृत्यूशी लढा देणाऱ्या काशिश सुभाष गवळी (रा. गोणेवाडी, ता. मंगळवेढा) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

गावापासून अवघ्या ३ किमी अंतरावर काळाचा घाला
काशिश हिने बारावीनंतर बीसीए पूर्ण करून हैदराबाद येथे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून ती पुण्यात एका नामांकित कंपनीत नोकरी करत होती. रक्षाबंधन सणानिमित्त ती पुण्याहून मंगळवेढ्याला आली.

तेथून भावासोबत दुचाकीवरून मूळ गावी गोणेवाडीकडे जात असताना, गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर २९ ऑगस्ट रोजी त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या चारचाकीने जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत भावाचा मित्र महादेव परमेश्वर बंडगर याचा जागीच मृत्यू झाला होता, तर भाऊ कृतिक गवळी किरकोळ जखमी झाला होता.

५० दिवसांनंतर श्वास थांबले
अपघातात काशिशच्या डोक्याला व शरीराला अत्यंत गंभीर मार लागला होता. तिला तातडीने प्रथम मंगळवेढा व नंतर सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सुभाष गवळी यांनी अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत रोजगारावर अवलंबून राहून काशिश व तिच्या भावाला उच्चशिक्षित केले होते.
काशिश नोकरीला लागल्याने कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळत होता. मात्र, ५० दिवसांच्या अथक उपचारांनंतर अखेर १८ ऑक्टोबर रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाने गवळी कुटुंबाचा मोठा आधार हिरावला असून गोणेवाडी गावावर दुःखाची सावली पसरली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











