टीम मंगळवेढा टाईम्स :
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील तीव्र दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टँकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. जयकुमार गोरे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान महादेव आवताडे यांनी दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधत जनावरांच्या पाण्याचा कोटा वाढवून टँकर देण्याची जोरदार मागणी केली होती.

दुष्काळात जनावरांचे हाल; पाण्याचा कोटा अपुरा:
आमदार समाधान आवताडे यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सध्याच्या भीषण दुष्काळी स्थितीत जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत.

सध्याच्या शासकीय नियमानुसार मोठ्या जनावरांसाठी ३५ ते ४० लिटर तर लहान जनावरांसाठी १० ते १५ लिटर पाणी मंजूर केले जाते, जे प्रामुख्याने देशी जनावरांच्या हिशोबाने धरले जाते. प्रत्यक्षात संकरित गाईंसाठी दररोज १०० ते ११० लिटर तर लहान संकरित वासरांसाठी ३५ ते ४० लिटर पाण्याची गरज भासते.

मतदारसंघात जनावरांची संख्या मोठी असताना, प्रत्यक्ष संख्येचा विचार न करता टँकर मंजूर केले जात असल्याने पशुपालक शेतकऱ्यांना विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे जनावरांसाठी मंजूर पाण्याचे प्रमाण (लिटर) वाढवून त्यानुसार तातडीने टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार आवताडे यांनी केली होती.

पालकमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे आदेश:
आमदार समाधान आवताडे यांच्या या निवेदनाची तत्काळ दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना “तातडीने कार्यवाही करावी” असे लेखी आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरातील शेतकऱ्यांना व पशुपालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











