मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भागवत शंकर कसबे (वय ७५) यांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी, दि. १७ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे नंदेश्वर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भागवत कसबे हे शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी रात्री सात वाजल्यापासून बेपत्ता होते. त्यांची स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे त्यांना आपण कुठे जात आहोत, याचे भान राहत नव्हते. यापूर्वीही ते एकदा बेपत्ता झाले होते; मात्र त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला होता.

यावेळी कसबे कुटुंबीयांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात आणि कर्नाटकातही त्यांचा शोध घेतला. मात्र, आठ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता.

दरम्यान, नंदेश्वर येथील सौदागर यांच्या कोरड्या विहिरीजवळ शनिवारी, दि. १७ ऑक्टोबर रोजी अमोल सौदागर गेले असता त्यांना विहिरीत भागवत कसबे यांचा मृतदेह आढळून आला.

कसबे हे बेपत्ता असल्याची माहिती ग्रामस्थांना असल्याने त्यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
बेपत्ता झालेल्या दिवशीच विहिरीत पडले असल्याचा अंदाज
कसबे हे बेपत्ता झाल्याच्या दिवशीच विहिरीत पडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावातून हळहळ व्यक्त होत आहे. कसबे यांचा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











