टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):
येथील नामांकित ‘विठाई परिवार मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मंगळवेढा’ यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी खास ‘भव्य दांडिया स्पर्धा’, ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ तसेच ‘लकी ड्रॉ सोडत’ या उत्साही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


हा सोहळा रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता काटकर हॉस्पिटल शेजारी, दुर्गामाता नगर, मंगळवेढा येथे मोठ्या दिमाखात पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मा. सौ. सुनंदाताई आवताडे भूषवणार असून, महिला नेत्या मा. सौ. अंजलीताई आवताडे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मा. श्री. स्वप्नील प्रभू काळुंगे व विठाई परिवार यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

समाजातील ९ कर्तृत्ववान ‘नवदुर्गां’चा होणार विशेष सत्कार:
विविध कार्यक्षेत्रांत स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या ९ महिलांचा या वेळी ‘नवदुर्गा’ म्हणून गौरव केला जाणार आहे:

सौ. दयाताई वाकडे (साहित्यिक), सौ. सुनिता चवरे (पोलीस), सौ. सुषमाताई सुतार (शिक्षिका), सौ. डॉ. मंजिरी आसबे (डॉक्टर), सौ. अपर्णाताई जाधव (वकील),

सौ. अरुणाताई माळी (व्यवसायिका) सौ. मनीषाताई मिसाळ (कृषी अधिकारी), निकीताताई जाधव (निवेदिका), कु. पूजाताई चव्हाण (खेळाडू)

आकर्षक रोख बक्षिसे आणि भेटवस्तू
दांडिया स्पर्धेतील विजेत्यांसाठी संस्थेच्या वतीने रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत:
प्रथम बक्षीस: ₹ १०,०००/-
द्वितीय बक्षीस: ₹ ७,०००/-
तृतीय बक्षीस: ₹ ५,०००/-
विशेष आकर्षण: स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक सहभागी कलाकारास हमखास भेटवस्तू दिली जाणार आहे.
स्पर्धेचे नियम व अटी:
१) संघात स्पर्धकांची संख्या ४ ते १० असावी।
२) स्पर्धेसाठी गाण्याचा कालावधी ४ ते ६ मिनिटे असावा
३) स्पर्धेसाठी पारंपरिक वेशभूषा अनिवार्य आहे।
४) स्पर्धकांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे।
नाव नोंदणीसाठी संपर्क: ९०७५१६५७५७
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्या सौ. करुणाताई शिवशरण व सौ. संगीताताई दुधाळ, पंचायत समितीच्या सभापती सौ. दिपालीताई ताड, उद्योजिका सौ. सुप्रियाताई जगताप यांच्यासह नगरपरिषदेच्या सर्व नगरसेविकांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या दांडिया स्पर्धा व सन्मान सोहळ्यास मंगळवेढा व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक विठाई परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











