मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. लग्न जुळत नसल्याने तरुणाने नायब तहसीलदार असल्याचा बनाव केला. इतकेच नव्हे तर अधिकारी असल्याचं भासवून त्याने एका महिलेशी लग्न देखील केलं. मात्र, लग्नानंतर दोन महिन्यातच त्याच्या ओळखपत्रावरून त्याचं पितळं उघड पडलं आहे.

नेमकं प्रकरण काय?
संदीप उर्फ सुवर्णदिप वानखडे असं या तोतया नायब तहसीलदाराचं नाव आहे. लग्न जुळत नसल्याने त्याने महसूल विभागात निवड झाल्याचा खोटा बनाव रचला होता.

इथेच न थांबता व्हाट्सअप ग्रुपवर विवाह करण्यासाठी बायोडाटा टाकला. त्यात त्याने नायब तहसीलदार नमूद केले होते. त्यानंतर अकोला शहरातल्या तापडिया नगर येथील दोन महिन्यांपूर्वी महिलेशी त्याचा विवाह झालाय.
मात्र, लग्नानंतर तो दिवसातून फक्त 2 तास कामांसाठी घराबाहेर पडत असल्याने त्याच्यावर पत्नीला संशय आलाय.

तिने संदीपच्या नायब तहसीलदार पदाच्या ओळखपत्राची अकोला तहसील कार्यलयात जात चौकशी केली. येथेचं आपला पती संदीप हा नायब तहसीलदार नसल्याचे तिला कळलं.

पुढं आपल्यासोबत धोका झाल्याचे समजताच महिलेने थेट पोलीस स्टेशन गाठलं. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी संदीप वानखडेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केलीय. मात्र, संदीपने लग्न जमण्यासाठी केलेला कारनामा आता अकोल्यात चांगलाच चर्चेत आला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












