मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
अशोक खरातवर चित्रीत होत असणाऱ्या महाराष्ट्रा एल्फिन्स्टन फाईल या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये एक घोटाळा झाला आहे. अशोक खरात सांगोला तालुक्यात येऊन पूजा करून गेला आहे. उघडे नागड्या पद्धतीने धिंगाणा घालून सांगोला येथील जवळ्याकडे पूजा केली आणि माझा भाचा असणाऱ्या अतुल पवारला निवडणुकीत पराभूत करून जीवे मारण्याची पूजा केली.

मात्र, मी माझ्या भाच्याला सांगितले. तुझा मामा या महाराजाच्या बापाचा बाप आहे. तू मरत नाही, काळजी करू नको. त्यामुळे हा प्रसंग अशोक खरातवर चित्रीत होणाऱ्या चित्रपटात घेतला आहे का? असा सवाल माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिपाली सय्यद यांना केला.

सांगोला येथे शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी मंत्री भरत गोगावले, मंत्री योगेश कदम , दिपाली सय्यद उपस्थित होत्या. यावेळी दिपाली सय्यद यांना उद्देशून शहाजी बापू पाटील यांनी सांगोल्यातील अशोक खरातचे कारनामे सांगून माजी आमदार दीपक साळुंखे यांना टोल लगावलाय.

आमचे पाणी अजितदादांनी इंदापूरला पळवले आणि पाणी राखण्यासाठी रक्तरंजित क्रांती करायची तयारी आम्ही सुरू केली. मीडियात भूमिका जाहीर केल्यानंतर अजित दादांचा फोन आला. म्हणाले तुमचे पाणीच नाही, त्यावेळेला मी गावात होतो आणि त्यांना सांगितले कागद तुमच्यासमोर आहे, उघडून बघा.

मग दादांनी पाणी असल्याचे मान्य केले. तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही फोन करून असले काही करू नका, असे सांगितले. आम्हाला कुठली गोष्ट संघर्षाशिवाय मिळाली नाही.
राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर, मंत्री भरत गोगावले दुसऱ्या ऑपरेशन विषयी बोलताना मध्येच थांबले..

महाराष्ट्रात पुन्हा एकदा लवकरच ऑपरेशन टायगर होणार आहे. याबाबतचे सुतोवाच राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सांगोल्यातील शिवसेना मेळाव्यात केले आहे.
सांगोला येथे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना मेळाव्याचे आयोजन केले होते. याच मेळाव्यामध्ये बोलताना माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पुनर्वसनाचे ही संकेत दिले.
शहाजी बापू पाटील धडपडून काम करत आहेत. त्यांच्या कामाचे चीज होणे गरजेचे आहे, असे सांगताना एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करतात ते कुणाला कळत नाही. लवकरच राज्यात दुसरे एक ऑपरेशन आहे. आता सांगत नाही, नाहीतर मीडिया बातम्या करेल. अशा शब्दात भरत गोगावले यांनी राज्यात लवकरच होणाऱ्या ऑपरेशन टायगरचे संकेत दिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











