mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

​भीषण अपघात! मंगळवेढ्याजवळ क्रेटा कारचा चक्काचूर, ‘या’ कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; २ जण जागीच ठार, तीन गंभीर जखमी; असा घडला थरकाप उडवणारा अपघात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 10, 2026
in क्राईम, मंगळवेढा
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

टीम ​मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा-सांगोला राष्ट्रीय महामार्गावरील आंधळगाव गावच्या हद्दीत काल संध्याकाळच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला आहे.

रस्त्यावरून चाललेल्या जेसीबी मशीनला पाठीमागून आलेल्या भरधाव क्रेटा कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कार चालकासह एका महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, कारमधील अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात दिनांक ८ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास धरणवाडी येथील पांडुरंग भाकरे यांच्या शेताजवळ घडला.

​असा घडला भीषण अपघात…

​मंगळवेढा येथील गणेशवाडीचे रहिवासी असलेले अनिल अशोक तानगावडे (वय ३७) हे आपल्या ताब्यातील जेसीबी मशीन (क्र. MH-13-ES-9568) घेऊन

आंधळगाव येथील काम संपवून सोलापूर-सांगोला राष्ट्रीय महामार्गाच्या डाव्या बाजूच्या लेनने घरी परतत होते.

दरम्यान, धरणवाडीजवळ आले असता पाठीमागून आलेल्या एका भरधाव काळ्या रंगाच्या क्रेटा कारने (क्र. MH-50-U-5121 / MH-50-V-5121) जेसीबीच्या पाठीमागील बकेटला अत्यंत जोरात धडक दिली.

​ही धडक इतकी भीषण होती की, धडकेच्या वेगामुळे जेसीबी मशीन रस्त्याच्या खाली उतरली. जेसीबी चालक अनिल तानगावडे हे केबीनमध्ये आदळल्याने त्यांच्या कपाळाला गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले.

​कारचा चक्काचूर; दोन जण जागेवरच ठार

​अपघातानंतर क्रेटा कारचा समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. कारमधील चालक आणि प्रवासी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले होते. या अपघातात कार चालक सुरज अशोक पाटील (रा. शेने, ता. वाळवा, जि. सांगली) आणि कारमधील महिला प्रवासी अर्चना अशोक पाटील हे दोघे गंभीर जखमी होऊन जागीच मृत पावले.

​तीन प्रवासी गंभीर जखमी

​कारमधील इतर प्रवासी देखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत
१) निता सुरज पाटील
२) अशोक तुकाराम पाटील
३) आयुष अंकुश पाटील
(सर्व राहणार: शेने, ता. वाळवा, जि. सांगली)

​मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल

​अपघातानंतर जखमींना तातडीने आंधळगाव येथील नडगिरे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जेसीबी चालक अनिल तानगावडे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात हजर राहून रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या जबाबावरून मृत कार चालक सुरज अशोक पाटील याच्याविरुद्ध निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात गाडी चालवून मृत्यूस व गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवेढा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अपघात मंगळवेढा

संबंधित बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 13, 2026
Next Post
शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, बियाण्यांची चिंता मिटली! मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी दिली 'ही' अत्यंत महत्त्वाची माहिती

ताज्या बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..