टीम मंगळवेढा टाईम्स ।
भाजपच्या अक्कलकोट, सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, माळशिरस व पंढरपूर- मंगळवेढा या पाच मतदारसंघांतील उमेदवारांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीत चार लाख ८३ हजार १२२ मते मिळाली होती.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव होऊनही २०२४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मतदान तब्बल एक लाख ३२ हजार ८५९ मतांनी वाढल्याचे दिसून आले. त्यात लाडक्या बहिणींची साथ मोलाची अन् निर्णायक ठरली आहे.
लेक लाडकी म्हणून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अव्वल ठरलेल्या खासदार प्रणिती शिंदेंचा शहर मध्य मतदारसंघ म्हणजेच काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपने काबिज केला आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून प्रणिती शिंदे सलग तीनवेळा आमदार झाल्या. लोकसभा निवडणूक जिंकल्यावर काँग्रेस हा बालेकिल्ला राखणार का? याची सर्वांनाच उत्सुकता होती.
मोठ्या मताधिक्याने प्रणिती शिंदे खासदार झाल्याने त्या शहर मध्यचा बालेकिल्ला राखतील, असा विश्वास अनेकांना होता; मात्र मोची, मुस्लिम समाजाची नाराजी दूर करण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेस नेतृत्वाला भाजपने चांगलाच धडा शिकवला.
महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला येणारा हा मतदारसंघ पहिल्यांदाच भाजपने स्वत:कडे घेतला. त्यांचा पहिलाच उमेदवार येथून विजयी झाला. या मतदारसंघातून पहिल्यांदाच विजयी उमेदवाराने एक लाखावर मते घेतली आहेत.
विशेष बाब म्हणजे, देवेंद्र कोठेंनी एक लाखावर मते घेत पहिल्याच निवडणुकीत आमदारकीची लढाई जिंकली. ज्या मतदारसंघाच्या आमदाराने लोकसभेला भाजपच्या उमेदवाराला धुळ चारली, त्याच प्रणिती शिंदेंचा विधानसभा मतदारसंघ भाजपने मिळवला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज