मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
तळहाताच्या फोडाप्रमाणं मुलाला मोलमजुरी करुन शिकवलं. तो नोकरीला लागाला मात्र १५ वर्षांपासून आम्हाला सांभाळत नाही. आता आम्ही थकलो आहोत, कामधंदा होत नसल्याने भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत आहोत,
एक रुपयाही मुलाने दिला नसल्याची कैफियत मांडणारा अर्ज प्रशासन दरबारी दाखल झाला. यावर दखल घेत शिक्षक मुलाने आई-वडिलांना दरमहा १० हजार रुपये देण्याचा आदेश प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिला आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील अज्ञान गैबू वाघमारे व बायडाबाई अज्ञान वाघमारे यांच्या दि.८ डिसेंबर २०२५ च्या अर्जावर ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ मधील कलम ९ नुसार हा आदेश दिला आहे.

अज्ञान वाघमारे व बायडाबाई वाघमारे यांच्या अर्जात पेशाने शिक्षक असलेला मुलगा दशरथ याला मोलमजुरी करून शिकविले. तो पडसाळी जि. प. शाळेत शिक्षक आहे. १५ वर्षांपासून आम्हा आई-वडिलांना सांभाळत नाही.

संधी दिली तरी गैरहजर
वाघमारे पती-पत्नीच्या अर्जावर प्रांताधिकाऱ्यांनी एक जानेवारी रोजी सुनावणी ठेवली. सुनावणीचे पत्र उशिराने ५ जानेवारीला उशिराने मिळाल्याचे मुलगा दशरथने अर्ज दिला.

त्यानंतर १२ मार्च रोजी ठेवलेल्या सुनावणीला दशरथ गैरहजर राहिला व लेखी म्हणणे दिले नाही. त्यानंतर आई-वडिलांना दरमहा १० हजार रुपये उदरनिर्वाहासाठी देण्याचे आदेशात नमूद केले आहे.

आम्ही थकल्याने आता कामधंदा होत नाही. मुलाचे सासू-सासरे व सून भांडण करून मारहाण करण्यास अंगावर येतात, असे म्हटले आहे.
या अर्जावर आई व वडिलांना प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे महिन्याला १० हजार रुपये देण्याचा प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिला आहे.

आई-वडिलांना सन्मानाची वागणूक द्यावी
प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशात मुलगा दशरथ याने आई-वडिलांना सन्मानाची वागणूक द्यावी, गटविकास अधिकाऱ्यांनी मुलगा दशरथच्या वेतनातून रक्कम वसूल करून आई-वडिलांच्या बँक खात्यावर जमा करावी, असे म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











