मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा निवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांना दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांना अतिआत्मविश्वास नडला तर प्रत्येक सभेमध्ये भावनिक भाषण करून लोकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला हे कुठेतरी जनतेला खटकले असल्याचे समोर येत आहे.
भगीरथ भालके यांना पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करावे लागेल. केवळ सहानुभूती वरती आपण चालणार नाही तर आपल्याला सतत सक्रिय राहून काम केले पाहिजे आणि लोकांच्या विकासाचा अजेंडा समोर दिला पाहिजे, हा बोध त्यांनी घ्यावा.
टुकार आणि नियोजन शून्य कार्यकर्त्यांचा संच आपल्याला विजयापर्यंत येऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला जाणकार, विकासाभीमुख आणि लोकांसाठी प्रामाणिकपणे वेळ देणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा समूह बनवण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
त्यांचा मतांचा गड्ढा अबाधित राहिला आणि पंढरपूर शहरात त्यांचेच वर्चस्व टिकून राहिले आहे ही त्यांच्यासाठी मोठी संधी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हे त्यांचे बलस्थाने आहेत हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे आणि त्यावर काम केले पाहिजे.
भगीरथ भालके यांना या निमित्ताने दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. विठ्ठल कारखाना हातातून गेल्यानंतर खचलेले भगीरथ भालके यांना काँग्रेसच्या उमेदवारीमुळे थोडीफार नवसंजीवनी मिळाली.
समाधान आवताडे यांच्या तुलनेत त्यांच्याकडे धनशक्ती नव्हतीच, परंतु सक्षम यंत्रणा देखील नव्हती. स्वर्गीय भारत नानांची सहानुभूती आणि झुंजण्याची जिद्द याच्या पलीकडे त्यांच्याकडे कुठलेही भांडवल नव्हते.
महाविकास आघाडीतील बिघाडीमुळे राष्ट्रवादीने आधीच त्यांच्याशी फारकत घेतली. शरद पवार यांच्याकडून खच्चीकरण झाले. प्रसंगी उमेदवारीपासून त्यांचे हसे करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे प्रतिमा हनन करण्याची संधी साधली गेली.
नॉट रीचेबल सारखा कलंक अधिक गडद करण्याचा जोमाने प्रचार झाला. परंतु या सर्व परिस्थितीवर मात करून त्यांनी त्यांच्या एक लाख मतांचा गठ्ठा अबाधित ठेवला. तथापि समाधान आवताडे यांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या करिष्मा समोर टिकू शकले नाहीत हे निश्चित.
अवताडे यांच्या पाठीमागे ज्याप्रमाणे भाजपाची एक मोठी फौज होती, श्रेष्ठींचा, ज्येष्ठ ने श्रेष्ठ नेत्यांचा आशीर्वाद होता. तसा काँग्रेसवात्यांचा आशीर्वाद कमवणे देखील भगीरथ भालके यांना जमले नाही.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज