टीम मंगळवेढा टाईम्स ।
आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा.लि. नंदुर. या साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२२- २३ मध्ये गळीतास आणलेल्या उसाचे सर्व बिल ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी दिली आहे.
त्याचबरोबर जिल्ह्यातील खाजगी कारखानदारी मध्ये आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. या साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना 2350 रुपये उच्चांकी दर दिला असुन वाहतूक ठेकेदार यांची उर्वरित बिले हि चालू आठवड्यात पुर्ण आदा केली जातील.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेला हा साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालविला आहे.
शेतकरी व ऊस उत्पादकांचे हित डोळ्यासमोर ठेवून हे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी अनुभवाच्या जोरावर कारखाना प्रशासनातील मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके,
कार्यकारी संचालक मोहन पिसे यांचे कामाचा कुशल अनुभवाचा जोरावर, अधिकारी व कर्मचारी यांच्या कुशल कामगिरीने कारखान्याने पहिल्याच हंगामात चार लाख तीन हजार मे. टन उसाचे विक्रमी गाळप केले आहे.
पुढील हंगामात ही असेच विक्रमी ऊसाचे गाळप करून शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा जास्तीत जास्त मोबदला देण्याचा आमचा टीमचा प्रयत्न असेल असे चेअरमन संजय आवताडे यांनी बोलताना सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज