टीम मंगळवेढा टाईम्स।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटन बांधणीला मंगळवेढा तालुका आणि शहरात वेग आला आहे. पक्षाच्या सर्व ३७ सेलच्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी आणि इतर महत्त्वाच्या निवडी संदर्भात

आज रविवार, २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता हॉटेल सुगरण, मंगळवेढा-पंढरपूर रोड, मंगळवेढ्यात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा मंगळवेढा तालुका निरीक्षक प्रा.महादेव तळेकर यांनी अधिकृत पत्रक काढून ही माहिती दिली आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांना निमंत्रण
या बैठकीमध्ये मंगळवेढा तालुका व शहर परिसरातील पक्षाच्या सर्व ३७ सेलच्या तालुकास्तरीय व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या (महिला व पुरुष) आगामी निवडींवर सविस्तर चर्चा होणार आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीला पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नवीन इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. महादेव तळेकर यांनी केले आहे.
आगामी काळातील पक्षाची ताकद आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, संपूर्ण तालुक्याचे या निवडींकडे लक्ष लागले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














