टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व निरीक्षक प्रा.महादेव तळेकर ही बैठक संपन्न झाली.
गेल्या काही काळापासून तालुक्यातील पक्ष संघटनेत आलेली शिथिलता दूर करून, आगामी काळात मजबूत पक्षबांधणी करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला पक्षातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती यामध्ये माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरुण तोडकर, महिला जिल्हाध्यक्ष पल्लवी पाटील, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेख, उद्योजक राहुल ताड, शिवशंकर कवचाळे, सुरेश कट्टे, दादा पवार,

विष्णु शिंदे, सुभाष दोडके, आण्णा सिरसट, मुझमिल काझी, संतोष गोवे, महादेव मुदगुल, पांडुरंग निराळे, पांडुरंग माळी, ज्ञानेश्वर गरंडे, नाना करपे, जैनुद्दीन पटेल, चंद्रकांत पाटील, चौगुले गुरुजी, माणिक गुंगे, सैफन शेख, अजिंक्य बेदरे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते.

पदाधिकारी निवडीसाठी मुलाखती; ‘या’ नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!
बैठकीचे मुख्य आकर्षण म्हणजे आगामी काळातील पदाधिकारी निवडी संदर्भात घेण्यात आलेल्या मुलाखती.

अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या प्रक्रियेनंतर मंगळवेढ्यातील पक्ष नेतृत्वाची धुरा कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार: तालुकाध्यक्ष पदासाठी: सिध्देश्वर रणे
शहराध्यक्ष पदासाठी: राहुल ताड आणि माऊली कोंडूभैरी यांच्या नावांवर लवकरच पक्षाकडून अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

विस्कळीतपणा दूर करून ‘मिशन पक्षबांधणी’
मंगळवेढा तालुक्यात गेल्या काही दिवसांत पक्षांतर्गत आलेली मरगळ आणि विस्कळीतपणा दूर करणे हा या बैठकीचा मुख्य अजेंडा होता. उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना नवऊर्जा देत, येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे आणि पक्षाचे नेटवर्क मजबूत करण्याचे आवाहन केले.

या महत्त्वपूर्ण बैठकीचे नेटके सूत्रसंचालन मंगळवेढा पंढरपूर मतदार संघ अध्यक्ष पांडुरंग जावळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार माऊली कोंडूभैरी यांनी मानले.
या बैठकीमुळे मंगळवेढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












